डाक बंगल्यात एसी रूम नाही म्हणताच कर्मचाऱ्याला केली मारहाण!

By रवींद्र देशमुख | Updated: July 9, 2023 15:57 IST2023-07-09T15:57:09+5:302023-07-09T15:57:39+5:30

दोन तरुणावर गुन्हा दाखल

as soon as he said that there is no ac room in the dak bungalow the employee was beaten | डाक बंगल्यात एसी रूम नाही म्हणताच कर्मचाऱ्याला केली मारहाण!

डाक बंगल्यात एसी रूम नाही म्हणताच कर्मचाऱ्याला केली मारहाण!

रवींद्र देशमुख, सोलापूर : सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात वातानुकूलित रुम उपलब्ध नाही असे म्हटल्याने कर्मचार्याला शिवीगाळ करत चापट मारल्या प्रकरणी दोघांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मनोज भोसले, आकाश बोळे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत किरण रतन चव्हाण ( रा. सेटलमेंट फ्री काॅलनी) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी चव्हाण हे  शासकीय विश्रामगृह येथे चौकीदार व शासकीय रुम भाड्याने देण्याचे काम पाहतात. ते आपले कर्तव्य बजावत असताना आरोपी मनोज भोसले व आकाश बोळे हे तेथे येऊन आम्ही सात ते आठ मित्र आहोत. त्यांना एक एअर कंडीशन रुम द्या असे सांगितले. तेव्हा फिर्यादीने वातानूकुलीत रुम उपलब्ध नाही असे सांगितले. यामुळे चिडून आरोपींनी फिर्यादीची गच्ची पकडून गालावर चापट मारून, अश्लिल शिवीगाळ केली, अशा आशयाची फिर्याद चव्हाण यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वरील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास नदाफ करत आहेत.

Web Title: as soon as he said that there is no ac room in the dak bungalow the employee was beaten