सोलापूरमध्ये चूळ भरण्याचं निमित्त झालं, तरुणाला पाईपने बेदम मारहाण
By रवींद्र देशमुख | Updated: July 3, 2023 18:13 IST2023-07-03T18:13:05+5:302023-07-03T18:13:28+5:30
चुळ भरताना समोरच्याचा गैरसमज झाला आणि शुभम सूर्यकांत कांबळे हा तरुणाला पाईपने बेदम मारहाण करुन जखमी केले.

सोलापूरमध्ये चूळ भरण्याचं निमित्त झालं, तरुणाला पाईपने बेदम मारहाण
सोलापूर : हल्ली किरकोळ कारणावरुन गैरसमज निर्माण होऊन मारहाणीच्या घटना घडतात. असाच प्रकार विडी घरकूल कुंभारी येथे रविवारी आठच्या सुमारास घडली. चुळ भरताना समोरच्याचा गैरसमज झाला आणि शुभम सूर्यकांत कांबळे (वय- १८) हा तरुणाला पाईपने बेदम मारहाण करुन जखमी केले.
जखमी हा कुंभारी परिसरातील विडी घरकूल परिसरात राहतात. रविवारी आठच्या सुमारास तो घराबाहेर येऊन चुळ भरत होता. यावेळी अमोगसिद्ध कांबळे याचा गैरसमज झाला त्याने पाईपनं बेदम मारहाण करुन जखमी केले. यात शुभमच्या हाताला जखम झाली. जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.