उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोलापुरात आगमन
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 3, 2024 10:29 IST2024-02-03T10:29:05+5:302024-02-03T10:29:11+5:30
माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर दुपारी उपमुख्यमंत्री पवार हे भोजन करणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोलापुरात आगमन
सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर असून सकाळी सव्वादहा वाजता कुंभारी येथील हेलीपॅडवर त्यांचे आगमन झाले.
दर्शनासाठी सिद्धेश्वर मंदिराकडे रवाना झाले असून त्यानंतर पावणे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय बैठक घेणार आहेत. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. शासकीय बैठकीनंतर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक किसन जाधव यांच्या घरी जाणार आहेत.
माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर दुपारी उपमुख्यमंत्री पवार हे भोजन करणार आहेत. दुपारी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला ते हजेरी लावणार आहेत. या मेळाव्यात सोलापुरातील काही माजी नगरसेवक व माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.