शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणाचा परिसर बिबट्याच्या दहशतीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:52 IST

सोलापूर : करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असून, अद्याप बिबट्याला पकडून जनतेला दहशतमुक्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. करमाळा तालुक्यातील जेऊरपासून भिगवणपर्यंत  चिकलठाण, केत्तूर, उंदरगाव, रामनगर आदी परिसरात उसाची शेती असल्याने बिबट्याला लपण्यास रान मोकळे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दररोज कुठे ना कुठे ...

ठळक मुद्देजनतेला दहशतमुक्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाहीदररोज कुठे ना कुठे लहान-सहान पाळीव प्राण्यांवर हल्लेवनमंत्र्यांना फोन; यंत्रणा गतिमान

सोलापूर : करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असून, अद्याप बिबट्याला पकडून जनतेला दहशतमुक्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. 

करमाळा तालुक्यातील जेऊरपासून भिगवणपर्यंत  चिकलठाण, केत्तूर, उंदरगाव, रामनगर आदी परिसरात उसाची शेती असल्याने बिबट्याला लपण्यास रान मोकळे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दररोज कुठे ना कुठे लहान-सहान पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडत आहेत.

याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले असले तरी  बिबट्याला पाहिल्याचे ठामपणे कोणी सांगत नसल्याने  वनविभागाने पायाच्या ठशावरुन  बिबट्यासदृश हिंस्त्र प्राणी वावरत असल्याचे अनुमान काढले आहेत.  त्यानुसार दोन पिंजरे लावले परंतु बिबट्या पिंजºयातील भक्ष्याऐवजी शेतकºयांच्या शेळ्या, गायी, कुत्रे यावरच हल्ला करत गेला.  

वनमंत्र्यांना फोन; यंत्रणा गतिमान- वैतागलेल्या एका शेतकºयाने चक्क वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला आणि तोच फोन मोहोळ विभागाच्या वनक्षेत्रपाल जयश्री पवार यांना जोडून दिला. थेट वनमंत्र्यांनीच सापळे वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार वनविभागाने  मोहीम गतिमान केली आहे. परिसरात तीन सापळे लावण्यात आले असून चार गार्डची चोवीस तास नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरTigerवाघSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारUjine Damउजनी धरणFarmerशेतकरी