उजनी धरणाचा परिसर बिबट्याच्या दहशतीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:50 PM2018-08-21T14:50:33+5:302018-08-21T14:52:47+5:30

The area of ​​Ujani Dam is under the scanner of leopard | उजनी धरणाचा परिसर बिबट्याच्या दहशतीखाली

उजनी धरणाचा परिसर बिबट्याच्या दहशतीखाली

Next
ठळक मुद्देजनतेला दहशतमुक्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाहीदररोज कुठे ना कुठे लहान-सहान पाळीव प्राण्यांवर हल्लेवनमंत्र्यांना फोन; यंत्रणा गतिमान

सोलापूर : करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असून, अद्याप बिबट्याला पकडून जनतेला दहशतमुक्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. 


करमाळा तालुक्यातील जेऊरपासून भिगवणपर्यंत  चिकलठाण, केत्तूर, उंदरगाव, रामनगर आदी परिसरात उसाची शेती असल्याने बिबट्याला लपण्यास रान मोकळे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दररोज कुठे ना कुठे लहान-सहान पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडत आहेत.

याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले असले तरी  बिबट्याला पाहिल्याचे ठामपणे कोणी सांगत नसल्याने  वनविभागाने पायाच्या ठशावरुन  बिबट्यासदृश हिंस्त्र प्राणी वावरत असल्याचे अनुमान काढले आहेत.  त्यानुसार दोन पिंजरे लावले परंतु बिबट्या पिंजºयातील भक्ष्याऐवजी शेतकºयांच्या शेळ्या, गायी, कुत्रे यावरच हल्ला करत गेला.  

वनमंत्र्यांना फोन; यंत्रणा गतिमान
- वैतागलेल्या एका शेतकºयाने चक्क वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला आणि तोच फोन मोहोळ विभागाच्या वनक्षेत्रपाल जयश्री पवार यांना जोडून दिला. थेट वनमंत्र्यांनीच सापळे वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार वनविभागाने  मोहीम गतिमान केली आहे. परिसरात तीन सापळे लावण्यात आले असून चार गार्डची चोवीस तास नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. 

Web Title: The area of ​​Ujani Dam is under the scanner of leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.