कांदा अनुदानासाठी सोलापूर जिल्ह्यातील २३ हजार शेतकºयांनी केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:24 PM2019-02-01T13:24:14+5:302019-02-01T13:25:34+5:30

सोलापूर : दीड महिन्यात जिल्ह्यातील ५५ हजार शेतकºयांनी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री केली असली तरी अनुदानासाठी सुमारे ...

An application by 23,000 farmers of Solapur district for onion subsidy | कांदा अनुदानासाठी सोलापूर जिल्ह्यातील २३ हजार शेतकºयांनी केले अर्ज

कांदा अनुदानासाठी सोलापूर जिल्ह्यातील २३ हजार शेतकºयांनी केले अर्ज

googlenewsNext
ठळक मुद्देरकमेसाठी पात्र ठरले केवळ साडेआठ हजार उत्पादकआठ कोटी रुपये मिळतील; दीड महिन्यात ५५ हजार शेतकºयांनी कांदा विक्री केला होतासातबाºयावर कांद्याची नोंद असलेल्या व एका शेतकºयाला किमान २०० क्विंटलपर्यंत अनुदान मिळणार

सोलापूर : दीड महिन्यात जिल्ह्यातील ५५ हजार शेतकºयांनी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री केली असली तरी अनुदानासाठी सुमारे २३ हजार शेतकºयांनी अर्ज केले होते. त्यातील केवळ ८ हजार  ७६९ शेतकºयांचेच अर्ज पात्र ठरले आहेत. जिल्हाभरातील शेतकºयांना ८ कोटी ८ लाख ३५ हजार १७४ रुपये अनुदान मागणी केले जाणार आहे.

राज्यात कांद्याचे दर घसरल्याने राज्य शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कांद्याची विक्री झालेल्या शेतकºयांना अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. सोलापूर बाजार समितीमध्ये ४९ हजार ९०९ व अन्य बाजार समित्यांमध्ये असा एकूण ५५ हजार शेतकºयांनी कांदा विक्री केल्याची माहिती बाजार समित्यांनी शासनाला पाठविली होती.

त्यानंतर प्रत्यक्षात अर्ज मागविण्यात आल्यानंतर अनुदान मागणी अर्ज फारच कमी आहे, सोलापूर बाजार समितीमध्ये अवघे १६ हजार ९४० तर अन्य बाजार समित्यांमध्ये ६ हजार अर्ज शेतकºयांनी केले होते. त्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये सोलापूर बाजार समितीचे ८ हजार ५७८ शेतकरी अनुदानास पात्र ठरले. कुर्डूवाडी, पंढरपूर, बार्शी,करमाळा, मंगळवेढा अकलूज बाजार समित्यांचे केवळ १९१ शेतकरी पात्र ठरले.

सोलापूर बाजार समितीच्या ८ हजार ५७८ शेतकºयांचा अनुदानासाठी ३ लाख ९७ हजार ४१८ क्विंटल ४७२ किलो कांदा पात्र झाला. ७ कोटी ९८ लाख ९९ हजार ११० रुपये इतकी रक्कम अनुदानासाठी मिळणार आहे. अन्य बाजार समित्यांना १९१ शेतकºयांसाठी ४ हजार ६८० क्विंटल कांद्यासाठी ९ लाख ३६ हजार ६४ रुपये अनुदान मिळणार आहे. हे पात्र अर्ज व ही रक्कम केवळ सातबारा उताºयावर कांद्याची नोंद असलेल्या शेतकºयांना मिळणार आहे.

अवघे १९१ शेतकरी पात्र
जिल्ह्यातील सोलापूर वगळता ७ बाजार समित्यांमध्ये  अनुदानासाठी दाखल झालेल्यांपैकी केवळ १९१ शेतकरी अनुदानाला पात्र ठरले आहेत. या बाजार समित्यांमध्ये ५ हजारांहून अधिक शेतकºयांनी कांदा विक्री केला होता. तर अनुदानासाठी आलेल्या अर्जामध्ये तलाठ्यांनी दाखला दिलेल्या शेतकºयांची संख्या ३८९ आहे. उर्वरित अर्ज अनुदानासाठी अपात्र झाले असल्याचे सांगण्यात आले. 

सातबाºयावर कांद्याची नोंद असलेल्या व एका शेतकºयाला किमान २०० क्विंटलपर्यंत अनुदान मिळणार आहे. सातबाºयावर कांद्याची नोंद नाही परंतु  तलाठ्याचा दाखला असलेल्याची माहिती कळविण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे शासन निर्णय आल्यानंतर त्यांनाही अनुदान मिळेल.
- अविनाश देशमुख
 जिल्हा उपनिबंधक सोलापूर

Web Title: An application by 23,000 farmers of Solapur district for onion subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.