शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष कोणताही..परंतु माढा लोकसभेचा खासदार म्हणे रणजितसिंह मोहिते-पाटीलच होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 12:59 IST

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा पेच कायम असताना मोहिते-पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ‘विकासाचा वारसदार, रणजितदादा पुन्हा खासदार’ ...

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी माढ्यातून लढणार नसल्याचे पुण्यात स्पष्ट केलेखासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुत्र रणजितसिंह यांना उमेदवारी देण्याची मागणी केली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही रणजितदादांच्या नावाला विरोध असल्याचे सांगितले

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा पेच कायम असताना मोहिते-पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ‘विकासाचा वारसदार, रणजितदादा पुन्हा खासदार’ अशी चर्चा सुरू केली आहे. यामुळे, पक्ष कोणताही मात्र रणजितदादांना खासदार करणारच, ही त्यांच्या गटाची भूमिका स्पष्ट झाली आहे. 

 शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर आता कोणत्याही परिस्थितीत माढ्याच्या मैदानात उतरायचे, असा निर्णय घेऊन रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी माढ्यातून लढणार नसल्याचे पुण्यात स्पष्ट केले. या बैठकीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुत्र रणजितसिंह यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. त्याला जिल्ह्यातील नेत्यांनी विरोध केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही रणजितदादांच्या नावाला विरोध असल्याचे सांगितले. पण हा विरोध यापूर्वी झाला होता.

आता आम्ही विरोधाचा सामना करायला तयार आहोत, असे मोहिते-पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा विषय शरद पवार यांच्या गोटात ढकलला. त्यामुळे रणजितसिंहांनी त्याच दिवशी मुंबई गाठली. सकाळी भाजपाचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. रणजितसिंह कोणत्या पक्षाकडून लढणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण जवळच्या कार्यकर्त्यांनी मोहिम सुरू केल्याचे दिसून येत आहे. 

मोहिते-पाटलांची दोन्ही पक्षांकडून कोंडी- च्एकीकडे राष्ट्रवादीतील नेत्यांनी रणजितदादांच्या उमेदवारीला विरोध केला तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी त्यांना प्रतीक्षेत ठेवले आहे. यामुळे दोन्ही पक्षांकडून मोहिते-पाटलांची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलElectionनिवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस