शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ऑनर किलिंग प्रकरणातील अनुराधाच्या पतीचाही संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 16:25 IST

राज्यभर गाजलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सलगर येथील डॉ अनुराधा बिराजदारच्या ऑनर किलिंग प्रकरणातील डॉ. अनुराधाचा पती श्रीशैल बिरादार याचा मृतदेह आढळून आला आहे.

ठळक मुद्देसलगर येथील डॉ अनुराधा बिराजदारच्या ऑनर किलिंग प्रकरणातील डॉ. अनुराधाचा पती श्रीशैल बिरादार याचा मृतदेह आढळून आला.अनुराधाचा मृत्यू झाला त्याचठिकाणापासून २० फूट अंतरावर पती श्रीशैल्य बिरादारचाही मृत्यू झाला.पोलिसांनी वडील विठ्ठल व आई श्रीदेवी बिराजदार यांना अटक केली आहे. 

सोलापूर - राज्यभर गाजलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सलगर येथील डॉ अनुराधा बिराजदारच्या ऑनर किलिंग प्रकरणातील डॉ. अनुराधाचा पती श्रीशैल बिरादार याचा मृतदेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे  जिथे डॉक्‍टर अनुराधाचा मृत्यू झाला त्याचठिकाणापासून २० फूट अंतरावर पती श्रीशैल्य बिरादारचाही मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी श्वान पथक मागविण्यात आले आहे 

सलगर ( ता. मंगळवेढा ) येथील डॉ. अनुराधा बिराजदार ही कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिने आपल्या कुटुंबातील शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या श्रीशैल बिरादार याच्याशी विजापूर येथे नोंदणी विवाह पध्दतीने प्रेमविवाह केला होता. सालगड्याच्या मुलाबरोबर लग्न केल्याचा राग मनात धरून अनुराधाला सलगर येथे ४ ऑक्टोबर रोजी रात्री आपल्या शेतात आणून वडिल विठ्ठल बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी या दोघांनी तिला विषारी औषध पाजून ठार मारले होते. याप्रकरणी  पोलिसांनी वडील विठ्ठल व आई श्रीदेवी बिराजदार यांना अटक केली आहे. 

डॉ. अनुराधा बिराजदार हिच्या खूनात समाविष्ट असणाऱ्या सर्व मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा व्हावी अन्यथा आत्महत्या करणार असल्याचा इशारा अनुराधाचा पती श्रीशैल बिराजदार यांनी काही दिवसांपूर्वीच लेखी निवेदनावर दिला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी जिथे अनुराधा बिराजदार हिच्यावर अंत्यसंस्कार झाले त्याच ठिकाणी तिचा हात पती श्रीशैल्यचा मृतदेह आढळून आला आहे.

आपल्या जीवाला धोका असल्याची शंका उपस्थित करणाऱ्या श्रीशैल्यने आत्महत्या केली की त्याचीही हत्या झाली याबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. ही आत्महत्या की हत्या याबाबतचा खुलासा अद्याप झाला नाही. घटनास्थळी मंगळवेढा पोलिस आले असून श्वानपथक पाचारण करण्यात आले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसDeathमृत्यू