शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

अ‍ॅन्टी करप्शन आपल्या दारी उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 17:31 IST

अजितकुमार जाधव : भ्रष्ट अधिकाºयांना धाक बसवणार; जनतेचे सेवक म्हणुन प्रामाणिक पणे काम करा

ठळक मुद्देलाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई मुख्यालयातील अजितकुमार जाधव यांनी शनिवारी पोलीस उपअधिक्षक म्हणुन सोलापुरचा पदभार स्विकारला. शहर, जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाºयांवर जबर धाक बसेल असच आपल काम असणार आहे. लोकसेवकांनी प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहन, सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नुतन पोलीस उपअधिक्षक अजितकुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सोलापूर : लोकसेवकांनी भ्रष्टाचार मुक्त कारभार केला पाहिजे, लोकांना त्रास होणार नाही अस वागुन काम करण आवश्यक आहे. तालुका पातळीवर ग्रामीण भागात ‘अ‍ॅन्टी करप्शन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार असुन तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. शहर, जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाºयांवर जबर धाक बसेल असच आपल काम असणार आहे. लोकसेवकांनी प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहन, सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नुतन पोलीस उपअधिक्षक अजितकुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई मुख्यालयातील अजितकुमार जाधव यांनी शनिवारी पोलीस उपअधिक्षक म्हणुन सोलापुरचा पदभार स्विकारला. रविवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, लोकसेवकांमधुन होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना झाली आहे. शासनाचा १00 रुपए पासुन अनुदान घेणाºया प्रत्येक लोकसेवकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडुन कारवाई केली जाऊ शकते. सर्वसामान्य जनता शासनाच्या विविध योजना व अन्य कायदेशीर कामासाठी शासकीय कार्यालयात जात असतात. जनतेची कामे करण्यासाठी पैशाची मागणी होत असेल तर त्याला आळा घालण्यासाठी संबंधितावर पुराव्यानीशी कारवाई केली जाते असे अजितकुमार जाधव म्हणाले. 

शहर, तालुकापातळीवर अशा अनेक तक्रारी येत असतात. ज्या उद्देशाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना झाली आहे, तो अधिक प्रभावी ठरावा म्हणुन भविष्यात सोलापुर जिल्ह्यात ‘अ‍ॅन्टी करप्शन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्याचा आपला संकल्प आहे. सध्या महाराष्ट्रात असा उपक्रम कोणत्याही जिल्ह्यात नाही, तो जर यशस्वी झाला तर सोलापुरातुन याची सुरूवात होईल. या उपक्रमासाठी एक व्हॅन तयार केली जाणार आहे. व्हॅन मध्ये एक राईटर, टेबल, लॅपटॉप, प्रिंटर, रेकॉर्डिंगची सोय आणि तक्रारदाराला बसण्याची सोय असणार आहे. टोल फ्री क्र. १0६४ वरून तक्रार आल्यास अ‍ॅन्टी करप्शनची व्हॅन संबंधित गावात जाईल. गाडीत सर्व प्रक्रिया पुर्ण करून तत्काळ लाच मागणाºया संबंधित कर्मचारी, अधिकारी व निवडुन आलेले पदाधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे असेही अजितकुमार जाधव यांनी सांगितले. 

मायभूमीत काम केल्याचा

मनस्वी आनंद : अरूण देवकर

- जिल्ह्यातील करमाळा हे माझ मुळ गाव याच ठिकाणी तीन वर्षाच्या कालावधीत अनेक धाडी टाकल्या, क्लास वन, क्लास टु आणि क्लास थ्रीच्या अधिकारी व कर्मचाºयांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. भ्रष्टाचार रोखण्यासाठी जेवढ शक्य होईल तेवढ काम केलं. माझ्या गावात मी काम केल्याच मला मनस्वी आनंद  होत आहे अशी प्रतिक्रिया सोलापुरातुन मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागात बदली झालेले अरूण देवकर पत्रकारांशी बोलताना दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिस