महिलेच्या कुटूंबातील आणखी एकाला काेरोनाची लागण; एकूण संख्या १४ वर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:38 IST2020-04-18T14:31:08+5:302020-04-18T14:38:04+5:30

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती; तेलंगी पाच्छा पेठ पोलिसांनी केला सील...!

Another woman's family infected Caron; Total number in Solapur is 5 | महिलेच्या कुटूंबातील आणखी एकाला काेरोनाची लागण; एकूण संख्या १४ वर 

महिलेच्या कुटूंबातील आणखी एकाला काेरोनाची लागण; एकूण संख्या १४ वर 

सोलापूर : शहरातील तेलंगी पाच्छा पेठ परिसरात शनिवारी कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला. त्यामुळे शहरातील काेराेना बाधीत रुग्णांची संख्या १४ झाली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतची माहती दिली. नवा रुग्ण महिलेच्या संपर्कातील आहे. 
तेलंगी पाच्छा पेठेतील एक ५६ वर्षीय दुकानदाराचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ६६९ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले आहे. या दुकानदाराच्या संपर्कातील महिलेला कोरोनाची लागण झाली होती. या महिलेच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब घेतल्यानंतर ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता या महिलेच्या संपर्कातील आणखी एका व्यक्तीची स्वॅब टेस्ट पॉझीटिव्ह आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एकूण ६६९ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले हाेते. शनिवारपर्यंत ५०४ लोकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४९० लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहत. अद्याप १६५ जणांचे रिपोर्ट प्रतिक्षेत आहेत.

Web Title: Another woman's family infected Caron; Total number in Solapur is 5