छत्रपती संभाजीनगरच्या शिकाऊ डॉक्टराने केली सोलापुरात आत्महत्या
By Appasaheb.patil | Updated: November 26, 2023 17:22 IST2023-11-26T17:22:34+5:302023-11-26T17:22:44+5:30
रेल्वे रुळाजवळ सदर तरुणाचा मृतदेह आढळला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या शिकाऊ डॉक्टराने केली सोलापुरात आत्महत्या
सोलापूर : सोलापूरपासून काही अंतरावर असलेल्या खाजगी मेडिकल कॉलेजमधील एका शिकाऊ विद्यार्थ्यांने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. हा अपघात सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील होटगी गावाजवळील रेल्वे लाइनजवळ घडली.
सचिन श्रीमंत चौधरी (वय २३, रा. छत्रपती संभाजीनगर ) असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचं नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, रविवारी सकाळी अकराच्या सुमारास वळसंग पेालिसांना स्टेशन मास्तराने फोन करून एकाने आत्महत्या केल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच वळसंग पेालिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले.
या घटनेची माहिती मिळताच मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक, विद्यार्थी व इतर कर्मचारी शासकीय रूग्णालयात दाखल झाले आहेत. सचिन चौधरी हा मेडिकलच्या व्दितीय वर्षात एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. तो मुळचा गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथील असून तो वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मागील दोन वर्षापासून सोलापूरजवळील कुंभारी येथे राहण्यास होता. सचिनच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले असून अधिक तपास वळसंग पेालिस करीत आहेत.