ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी

By Appasaheb.patil | Updated: October 3, 2024 09:22 IST2024-10-03T09:20:57+5:302024-10-03T09:22:02+5:30

घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित राहून जखमींना  उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात  दाखल केले आहे. 

An accident involving the devotees who had gone to bring the flame Two killed, six seriously injured | ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी

ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी

नितीन उघडे

कामती : तुळजापूरहून गोणेवाडी (ता. मंगळवेढा ) येथे ज्योत घेवून जाणारी चारचाकी पिकअप ही सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामती येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. यात दोघे ठार झाले असून सहाजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित राहून जखमींना  उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात  दाखल केले आहे. 

या अपघातात प्रदीप क्षीरसागर (वय २८ वर्ष), नेताजी कराळे (वय ३० वर्ष) दोघे रा. गोणेवाडी ता. मंगळवेढा अशी मयत दोघांची नावे आहेत. महेश बंडगर (वर्ष १७), वैभव हजारे (वर्ष २४), सोहेल मुलानी (वर्ष २५), समाधान माशाल (वर्ष ३०), रोहित कसबे (वर्ष २०), रोहित चव्हाण (वर्ष १२ सर्वजण रा. गोणेवाडी ता. सांगोला) हे जखमी झाले आहेत.

Web Title: An accident involving the devotees who had gone to bring the flame Two killed, six seriously injured