दुकाने उघडण्यास काही तास तरी परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:21 IST2021-04-10T04:21:49+5:302021-04-10T04:21:49+5:30
ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मंद्रुप पोलिसांनी निर्बंधाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. सकाळपासून एकही दुकान उघडता आले ...

दुकाने उघडण्यास काही तास तरी परवानगी द्या
ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मंद्रुप पोलिसांनी निर्बंधाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. सकाळपासून एकही दुकान उघडता आले नाही. त्यामुळे दुपारी सर्व दुकानदार एकत्र आले. त्यांनी अतिरिक्त तहसीलदार सोरटे यांची भेट घेतली. आम्ही नियम आणि कायद्याचे काटेकोर पालन करू. गेल्या वर्षभरामध्ये व्यापार थंडावला आहे. कर्जाचा बोजा वाढत आहे. आर्थिक संकटाशी सामना करावा लागत असल्याने पूर्णवेळ बंद ठेवण्याऐवजी थोडीशी सवलत द्या, अशी विनंती करणारे निवेदन दिले.
दुकाने बंद ठेवल्यास दुकानभाडे, वीज बिल, कामगारांचा पगार, बँक कर्जाचे हप्ते आणि व्याजाचा बोजा अशा असंख्य संकटामुळे आर्थिक बोजा वाढणार आहे. हा विचार करून आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती या निवेदनाद्वारे केली आहे. कोरोना विषयक नियमांचे पालन करण्याची हमीही त्यांनी यावेळी दिली. निवेदनावर किराणा दुकानदार कापड व्यावसायिक, कृषी विषयक मालाची दुकाने व अन्य व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत. तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांच्या भेटीनंतर शिष्टमंडळाने सहा. पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांची भेट घेऊन निवेदन दिले.