शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

बेईमान भाजपाशी यापुढे युती अशक्य, रामदास कदम यांचा हल्लाबोल, भाजपा-राष्टÑवादीत छुपी युती असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 15:05 IST

सेनेचे बोट धरुन भाजपा महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात पोहोचला. आज हाच भाजप सेनेशी बेईमानी करीत आहे. यापुढच्या काळात अशा बेईमान भाजपाशी शिवसेना कधीच निवडणूक युती करणार नाही.

ठळक मुद्देरामदास कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपावर थेट शरसंधान साधलेआम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या तयारीला लागलो आहोत : रामदास कदमआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एक वर्ष आधी आम्ही आमच्या पक्षाचे उमेदवार सर्वानुमते निश्चित होतील : रामदास कदम

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : सेनेचे बोट धरुन भाजपा महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात पोहोचला. आज हाच भाजप सेनेशी बेईमानी करीत आहे. यापुढच्या काळात अशा बेईमान भाजपाशी शिवसेना कधीच निवडणूक युती करणार नाही, असे वक्तव्य पर्यावरण मंत्री आणि सेनेचे नेते रामदास कदम यांनी सोलापुरात केले. सेनेचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे यांच्या कन्येच्या विवाहासाठी आलेल्या पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपावर थेट शरसंधान साधले. ते म्हणाले, भाजपा महाराष्टÑात फोफावला तो मुळी शिवसेनेमुळे. आज हाच भाजपा सेनेला नेस्तनाबूत करु पाहतोय ही तर आमच्याशी बेईमानी आहे. यापुढच्या काळात कधीच भाजपासोबत निवडणूक न लढवण्याचा आमचा निर्धार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ५६ इंच छातीचे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा  वाढदिवस साजरा करायला जातात. त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून खातात. इकडे देशाच्या सीमेवर येऊन पाकिस्तानी सैनिक आमच्या भारतीय सैनिकांवर गोळ्या घालतात तरीही आमचे पंतप्रधान गप्पच. ही कसली राष्टÑभक्ती म्हणायची, अशा शब्दात कदम यांनी पंतप्रधानांचा समाचार घेतला. आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या तयारीला लागलो आहोत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एक वर्ष आधी आम्ही आमच्या पक्षाचे उमेदवार सर्वानुमते निश्चित होतील, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला सेनेचे संघटक गोविंद घोळवे, मनपा विरोधी पक्षनेते महेश कोठे, जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते.---------------------------... म्हणून बाहेर पडणार नाहीशिवसेनेला राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला अनेकजण देतात. विशेषत: राष्टÑवादीचे नेते त्यात आघाडीवर आहेत. सेना बाहेर पडली तर राष्टÑवादी सत्तेत जाण्याच्या तयारीत आहे. म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडणार नाही, असे स्पष्टीकरण देताना रामदास कदम म्हणाले भाजपावर अंकुश ठेवण्यासाठी आणि राष्टÑवादीला रोखण्यासाठी आम्ही सत्तेत राहणार आहोत.

टॅग्स :SolapurसोलापूरRamdas Kadamरामदास कदम