शासन चालविण्याचा अनुभव नसलेले भाजप सरकार, पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजप सरकारवर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 15:21 IST2018-09-04T15:16:51+5:302018-09-04T15:21:02+5:30

शासन चालविण्याचा अनुभव नसलेले भाजप सरकार, पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजप सरकारवर आरोप
मंगळवेढा : 'सरकारमध्ये बसलेल्या लोकांना शासन चालवण्याचा अनुभव नाही. कुठलाही विचार न करता निर्णय घेतले जातात आणि लोकांनी विरोध केल्यावर निर्णय मागे घेतले जातात त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सरकार आणावे लागेल असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले
मंगळवेढा तालुका काँग्रेस च्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आहे त्यांनतर बाजार मैदानात सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर व्यासपीठावर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ भारत भालके, आ रामहरी रुपनवर, आ विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, नगराध्यक्ष अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, सुरेश कोळेकर, मारुती वाकडे, नगरसेवक राहुल सांवजी, महेश दत्तू,भारत बेदरे, दयानंद सोनगे, संतोष सोनगे, मल्लिकार्जुन बिराजदार आदी उपस्थित होते
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आ भालके यांच्या प्रयत्नातून ३५ गावची उपसा सिंचन योजना व ४० गावची पाणीपुरवठा योजना झाली मात्र सध्या च्या सरकार ने ३५ गावच्या योजनेसाठी निधी दिला नाही ही योजना काँग्रेस सरकार च पूर्ण करेल . या सरकारची धोरणे राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताची नाहीत तर फक्त देशातल्या मुठभर उद्योगपतींच्या हिताची आहेत. नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वसामान्यांचे अच्छे दिन आणायचे असतील तर भाजप सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणावे लागेल,'' असे चव्हाण म्हणाले.