शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

लऊळच्या तुकाराम ढोरेंची किमया; ७० दिवसांत १५ लाखांचे खरबूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 09:50 IST

प्रयोगशील शेतकरी; बेड न बदलता त्यावरच केली कलिंगडाची लागवड

ठळक मुद्देजिद्द अन् कृषी कर्तृत्वाच्या जोरावर त्याने गावात एक वेगळाच ठसा उमटवलादोन पिकांच्या माध्यमातून वार्षिक सरासरी ३०-३५ लाख रुपयांचे पीक घेण्याची  किमया साधलीआज कलिंगड, टरबूज व केळीचा मास्टर म्हणून तुकरामची या परिसरात ओळख निर्माण झाली

लक्ष्मण कांबळे कुर्डूवाडी : वडिलोपार्जित १५ एकर माळराऩ़़त्याला पाण्याचा स्रोत नाही..घरातील कोणत्याच व्यक्तीला सरकारी नोकरी नाही..एकत्र कुटुंब पद्धतीची दिनचर्या केवळ शेतीवरच..क़ष्टाला पर्याय नसल्याची जाणीव़..अनेक संकटांवर मात करुन सात वर्षांत दोन किलोमीटरवरून पाईपलाईन करून जैविक, सेंद्रिय आणि रासायनिक खतांच्या मात्राचा योग्य वापर केला़ ७० दिवसात खरबुजाचे पहिले पीक घेतले तर पुढील ८० दिवसात कलिंगड पिकाच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेतले़ आज दोन पिकांच्या माध्यमातून वार्षिक सरासरी ३०-३५ लाख रुपयांचे पीक घेण्याची  किमया साधली आहे लऊळ (ता़ माढा)मधील एका तरुण शेतकºयाने.

तुकाराम बबन ढोरे (वय ३८) असे त्या तरुण जिद्दी शेतकºयाचे नाव आहे. जिद्द अन् कृषी कर्तृत्वाच्या जोरावर त्याने गावात एक वेगळाच ठसा उमटवला आहे. तुकारामचे शिक्षण तसे बारावीपर्यंत झाले. घरची परिस्थिती ही बेताचीच होती. लऊळ- उजनी रस्त्यावर वडिलांची पंधरा एकर जमीन आहे. पण त्याला पाण्याचा स्रोत नव्हता. माळरानावर पाणी नसल्याने कुठलीही पिके घेता येत नव्हती. सात वर्षांपूर्वी त्यांनी उजनी(मा) येथून दोन किलोमीटर अंतरावरून सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या नजीक पाच गुंठे जमीन घेऊन त्यामध्ये विहीर खोदली़ त्यामधून पाईपलाईन केली.

आज कलिंगड, टरबूज व केळीचा मास्टर म्हणून तुकरामची या परिसरात ओळख निर्माण झाली. दरवर्षी कमीत कमीत पाच एकर कलिंगड, टरबूज व केळीचे प्लॉट बनवतात. त्यातून सरासरी दरवर्षी ३०-३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते आहे़ बाजारपेठेच्या अंदाजानुसार ते उत्पन्न घेतात़आज नियोजनात्मक पिके घेतली जात असल्याने तोटा अजिबात नाही़

१५० दिवसांत एकाच बेडवर दोन पिके- पहिले पीक खरबुजाचे हे ७० दिवसात घेतले गेले़ पहिल्या पिकासाठी तयार केलेल्या बेडवर मल्चिंग पेपर पुन्हा व्यवस्थित करुन कलिंगडची लागवड केली़ खरबुजासाठी एकरी ३ ते ४ ट्रेलर शेणखताचा मारा केला़ याबरोबरच दाणेदार भेसळ खत वापरले़ शेवटी लिंबोळी खताचा वापर करुन ७० दिवसात खरबुजाचे पीक घेतले़ त्यानंतर पुढील ८० दिवसात कलिंगडाचे पीक घेता आले़ बेड न बदलता पहिल्याच बेडवर अत्यल्प खर्चात दुसरे पीक घेण्याची किमया तुकाराम ढोरे यांनी साधली आहे़ 

कुटुंब राबते शेतात- ढोरे यांच्या एकत्रित कुटुंबपद्धतीत लहान मोठी १८ माणसे आहेत. शेतीमध्ये सर्वजण झोकून काम करतात. दोन भाऊ नवनाथ व धनाजी यांच्याबरोबरच पुतण्या केशव यांचेही यात योगदान आहे़ आजही हे एकत्र कुटुंबपद्धतीने राहताहेत़ आता त्यांनी वडिलांची १५ एकर जमीन वगळता फक्त शेती व्यवसायावर एकवीस एकर दुसरी जमीन विकत घेतली आहे. आता या कुटुंबाकडे ३६ एकर शेती आहे़ त्यातील २५ एकर सध्या बागायत आहे़ त्यात पाच एकर केळी, सात एकर खरबूज, तीन एकर कलिंगड, चार एकर द्राक्ष आहे़ उर्वरित रब्बी व खरीप पिकांसाठी जमीन वापरली जाते. सगळीकडे पाण्याचा चांगला स्रोत निर्माण केला आहे. त्यांची शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी दौरे करतात़ प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन कृषी क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे़ तुकाराम ढोरे यांना शासनाने शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे शेतीनेच आयुष्याला कलाटणी मिळाल्याचे ते सांगतात.

मशागतीबरोबर शेणखत, भेसळखत- पाण्याचा प्रश्न मिटल्यानंतर माळरानाची योग्य मशागत करून घेतली़ माती परीक्षण क रून घेऊन कलिंगड, टरबूज लावण्याचे धाडस केले. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यात मशागत,फवारणी, बेड, शेणखत, भेसळ खत, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन व त्यात चांगल्या प्रकारच्या बिया किंवा रोपांची लागवड केली़त्याला जैविक, सेंद्रिय व रासायनिक खतांची योग्य मात्रा देत एकरी भरघोस उत्पन्न काढले. ७०-८० दिवसांच्या या पिकावर एकरी चार- पाच लाख रुपये खर्च केले. त्यातूनच त्यांना खरा प्रगतीचा मार्ग सापडला. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfruitsफळे