ओटावा इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोलापूरचा अक्षय इंडीकर सर्वाेकृष्ट दिग्दर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 12:34 IST2021-06-29T12:34:21+5:302021-06-29T12:34:26+5:30

सोलापूरचा अटकेपार झेंडा....

Akshay Indikar from Solapur won Best Director at the Ottawa Indian Film Festival | ओटावा इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोलापूरचा अक्षय इंडीकर सर्वाेकृष्ट दिग्दर्शक

ओटावा इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोलापूरचा अक्षय इंडीकर सर्वाेकृष्ट दिग्दर्शक

सोलापूर : ओटावा इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड सोलापूरच्या अक्षय इंडीकर यांना मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारासोबतच ‘स्थलपुराण’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार नील देशमुख याला मिळाला आहे.

यामध्ये जागतिक सिनेमातील दर्जेदार चित्रपटांची संकलित यादी बनविणाऱ्या ‘मुबी डॉट कॉम’ या प्रतिष्ठित संकेतस्थळावर दिग्दर्शक अक्षय इंडीकर याच्या ‘स्थलपुराण’ या फिल्मला स्थान मिळाले आहे. डॅनियल सॅमन या मान्यवर चित्रपट समीक्षकांनी ही यादी तयार केली आहे. अमेरिकेतून प्रसिद्ध होणारी ही यादी जागतिक सिनेमा विश्वात महत्त्वाची मानली जाते.

Web Title: Akshay Indikar from Solapur won Best Director at the Ottawa Indian Film Festival