उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली, सोलापुरात राष्ट्रवादीचा जल्लोष, फटाके फोडले

By Appasaheb.patil | Updated: July 2, 2023 16:10 IST2023-07-02T16:09:42+5:302023-07-02T16:10:14+5:30

अजित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

ajit pawar took oath as deputy chief minister ncp jubilation crackers burst in solapur | उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली, सोलापुरात राष्ट्रवादीचा जल्लोष, फटाके फोडले

उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली, सोलापुरात राष्ट्रवादीचा जल्लोष, फटाके फोडले

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. याचवेळी एकमेकांना पेढे भरवत फटाकेही फोडले. अजितदादा तुम आगे बढो..हम तुम्हारे साथ हैं. अशा अजित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

रविवारी दुपारी दोनच्या सुमारास राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याशिवाय राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौकात) जल्लोष केला. यावेळी संतोष पवार, जुबेर बागवान, आनंद मुस्तारे, महेश निकंबे आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: ajit pawar took oath as deputy chief minister ncp jubilation crackers burst in solapur