रस्ता ओलांडताना ट्रकचा धक्क्याने डिव्हाडवर आपटून आजीबाई जखमी
By विलास जळकोटकर | Updated: December 30, 2023 18:28 IST2023-12-30T18:28:11+5:302023-12-30T18:28:30+5:30
रस्ता ओलांडत असताना मालट्रकचा धक्का लागल्याने ८० वर्षांच्या आजीबाई डिव्हाडरवर आपटल्याने गंभीर जखमी झाल्या.

रस्ता ओलांडताना ट्रकचा धक्क्याने डिव्हाडवर आपटून आजीबाई जखमी
सोलापूर : रस्ता ओलांडत असताना मालट्रकचा धक्का लागल्याने ८० वर्षांच्या आजीबाई डिव्हाडरवर आपटल्याने गंभीर जखमी झाल्या. सायंकाळच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे घरासमोरील रोडवर हा अपघात झाला. चिमाबाई शिवाजी चव्हाण (वय- ८०, रा. अणदूर) असे जखमी आजीचे नाव आहे. यातील जखमी आजीबाई घरासमोरील रस्त्यावरुन चालत रस्ता ओलांडत होत्या. अचानक मालट्रक आला त्याने धक्का मारल्याने त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हाडवर आपटल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तातडीने त्यांना नळदुर्गच्या सरकारी दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले.
डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना मुलगा शंकर चव्हाण याने तातडीने वाहन करुन सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले असून, त्या शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.