शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणणारे सोलापूरचे सिंघम, पोलीस आयुक्त शिंदेंचे अजय देवगणकडून कौतुक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:55 IST

Police Commissioner Ankush Shinde : नक्षलवाद्यांना  मुख्य प्रवाहात आणण्याचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या या  अधिकाऱ्यांचे नाव आहे  अंकुश शिंदे.  

-  खुशालचंद बाहेती

सोलापूर : नक्षली भागात तळागाळापर्यंत  काम  करुन त्यांनी बंदूक  उचलणाऱ्या  आदिवासींना शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. नक्षलग्रस्त भागातील  आदिवासींशी  संपर्क साधण्याची मोठी मोहीम उघडली  आणि  त्यांच्या दारापर्यंत जाऊन त्यांचे घरांचे, जमिनीचे, आरोग्य, शिक्षण व  बेकारीचे  प्रश्न समजून घेऊन  ते  सोडवण्यासाठी प्रयत्न केले. नक्षलवाद्यांना  मुख्य प्रवाहात आणण्याचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या या  अधिकाऱ्यांचे नाव आहे  अंकुश शिंदे.  या  कामगिरीचे  खुद्द  सिंघम  (अजय  देवणग)  यांनीही कौतुक केले  आहे.  सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे  हे  गडचिरोली येथे असताना त्यांनी  नक्षलवाद्यांना  मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्यांच्या  या  कामाची माहिती देणारा व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाला  आहे.  गडचिरोली जिल्ह्यात तरुणांचे  ब्रेनवॉश  करून त्यांना सशस्त्र चळवळीत  ओढण्याचे  काम  सातत्याने करण्यात येते. सामान्य  आदिवासीच्या  मनात शासन, प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण करण्यात येतो. त्यांना न  जुमानणाऱ्यांना  ठार  करून दहशत निर्माण करण्यात येते.  १९८४  पासून जवळपास  ७००  आदिवासींना  ठार  करण्यात  आले  किंवा गंभीर जखमी केले. नक्षली भागात  २२७  पोलिसांना  हौतात्म्य  आले.  यामुळे नक्षलवाद्यांची त्या परिसरात दहशत होती. याला  शह  देण्यासाठी  जून  २०१७  मध्ये गडचिरोली  परिक्षेत्राचा  पदभार घेतल्यानंतर अंकुश शिंदे यांनी नक्षलग्रस्त भागातील  आदिवासींशी  संपर्क साधण्याची मोठी मोहीम उघडली होती. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या.  यात  ८८  हजार  ५००  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यशवंतराव चव्हाण मुक्त  विद्यापीठामार्फत  १२५३  जणांना पदवी, पदविका शिक्षण दिले. आरोग्य तपासणी, बेरोजगारांचे मेळावे याचा  हजारोंना  लाभ  झाला. पोलिसांनी आयोजित केलेल्या आदिवासी नृत्य स्पर्धांमध्ये २ लक्ष  ७४  हजार जणांनी  भाग  घेतला.  आता गडचिरोलीचे  लोक  मुंबई मॅरेथॉन, पुणे-फलटण  या  स्पर्धेतही  सहभागी  होत  आहेत.

विश्वास संपादन केला  ५ लक्ष लोकांपर्यंत पोहोचून  काम  केल्याने आदिवासींचा विश्वास संपादन झाला. आदिवासी माहितीही  देऊ  लागले व  नक्षलवाद्यांना  विरोध  करू  लागले. त्यांच्या माध्यमातून  ५१  पोलिसांचा  बळी  घेणारा  मंगरू  बोगामी  याच्यासह  ४०  लोकांनी  आत्मसमर्पण  केले,  तर  ४ पोलीस व  १९  आदिवासींना  मारणारा  डोळेश  आत्रामसह  ७२ (एकाच दिवशी ४०) एन्काउंटर  झाले.  

टॅग्स :PoliceपोलिसAjay Devgnअजय देवगणSolapurसोलापूर