शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली; भाकितासाठी ज्योतिषी कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 05:14 IST

मुख्यमंत्री; थोरातांनीच आरशात पाहावे, आम्ही जनतेच्या चेहऱ्यात पाहतो

लातूर : काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली आहे, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लगावताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांनाही आरशात पाहण्याचा उलट सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिला.महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने लातुरात रविवारी सकाळी विश्रामगृहावर पत्रपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्या टीकेला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री काय ज्योतिषी आहेत काय? मी त्यांना सांगू इच्छितो तुमची हवा संपली आहे, हे भाकित करायला ज्योतिषाची गरज नाही. शिवाय, मला आरशात पाहण्याची गरज नाही. आम्ही जनतेच्या चेहºयात पाहतो. त्यामुळे आरशात पाहण्याची वेळ कोणावर आली आहे हे थोरातांनी समजून घेण्याची गरज आहे.

८३ मतदारसंघात यात्रा...दुसºया टप्प्याच्या यात्रेचा सोलापुरात समारोप होत असून, २ हजार ४४३ किलोमीटरचा प्रवास आणि ८३ मतदारसंघ पूर्ण झाले आहेत. त्यात मराठवाड्याने भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या भागाच्या दुष्काळमुक्तीवर भर राहील. जलआराखडा तयार आहे. ६४ हजार किलोमीटरची पाईपलाईन जोडून वॉटर ग्रीड साकारले जाईल. लातूर -उस्मानाबादच्याही निविदा निघतील. तसेच लातूरला उजनीचे पाणी देणार, असेही ते म्हणाले.मराठवाड्याला हक्काचे १०२ टीएमसी पाणी मिळणारमराठवाड्याच्या हक्काचे १०२ टीएमसी पाणी आहे. परंतु, ८० टीएमसीपेक्षा अधिक पाणी वापरु शकत नाही. ते वाहून जाते. त्यामुळे हक्काचे १०२ टीएमसी पाणी वापरण्यासाठी कोणत्याही प्राधिकरणाकडे जाण्याची गरज नाही. त्याच अर्थाने धरणे, प्रकल्प उभारण्यावरही बंधन राहणार नाही, असे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले.मेगा भरती नाही; निवडक भरतीजागावाटप पाहूनच निवडकांना प्रवेश दिला जात आहे. आमच्याकडे मेगा भरती नाही परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीत मेगा गळती नक्कीच आहे. इनकमिंगमुळे मूळ भाजपावर अन्याय होईल काय, या प्रश्नावर ते म्हणाले ९८ टक्के मूळ भाजपाच आहे. २ टक्केसुद्घा नवीन नाहीत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSolapurसोलापूरBJPभाजपाAmit Shahअमित शहा