Agitation of Maratha community; ST service closed in Solapur district on Monday | मराठा समाजाचे आंदोलन; सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील एसटी सेवा राहणार बंद

मराठा समाजाचे आंदोलन; सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील एसटी सेवा राहणार बंद

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकल मराठा समाजाने जिल्हा बंदची हाक दिली आहे़ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एसटी बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास सध्यस्थितीत स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ २१ सप्टेंबर २०२० रोजी मराठा समाज व मराठा आरक्षणाशी संबंधित असणाºया सर्व संघटनांच्यावतीने सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे. या बंद काळात एसटी बसेसच्या तोडफोडीसारखे प्रकार घडू शकतात त्यामुळे एसटी बसेसच्या तोडफोडीसारखे प्रकार होवू नयेत त्यामुळे कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी २१ रोजी मध्यरात्री १२ वाजून ०१ मिनिटांपासून २१ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपयृंत जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाºयांनी घेतला आहे.

Web Title: Agitation of Maratha community; ST service closed in Solapur district on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.