शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते म्हणाले,' होय, हे शक्य झालं ईव्हीएम नसल्यामुळेच !'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 13:07 IST

भाजपचा टोला; आमदारच असे म्हणत तर मिरॅकल

सोलापूर: पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निकालानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मतपत्रिकेवर विश्वास व्यक्त करीत ईव्हीएम मशीन संशोधनाचा विषय असल्याचे म्हटले आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीचा हा सामुहिक विजय असला तरी मतपत्रिकेवर ही निवडणूक झाली हे महत्वाचे असल्याचे नमूद केले आहे. मतपत्रिकेमुळे राजकारणाची वस्तुस्थिती लक्षात आली असून, भाजपला लाखाचे मताधिक्य देणाºया ईव्हीएम मशीन आता संशोधनाचा विषय झाल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीतून ईव्हीएम मशीनचा खरा प्रकार समोर आला असून, भविष्यात सर्व निवडणुका मतपत्रिकेवरच व्हायला हव्यात अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे आमदार शिंदे यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. 

     माजी आमदार दीपक साळुंके यांनीही पदवीधर व शिक्षक मतदार संघात मतपत्रिकेवर मतदान झाल्याने आम्ही निर्धास्त होतो असे म्हटले आहे. बटनावर आमचा विश्वास नाही. राज्यात पाच उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आले. विरोधात असलेली मंडळी एकाच व्यासपीठावर आणल्याने हे यश आल्याचे त्यांनी नमूद केले.

हे तर मिरॅकल : देशमुख

ईव्हीएम मशीनवर निवडून आलेले आमदारच संशय घेत असतील तर हे मिरॅकल म्हणावे लागेल असे प्रतिक्रिया भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली. सोलापूर व पुणे जिल्ह्याने भाजपला साथ दिली. कोल्हापूर, सांगली व सातारा पट्ट्यात महाविकास आघाडीच्या पारड्यात जादा मते गेल्याचे दिसत आहे. त्यांची एकजूट व बºयाच शिक्षण संस्था राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांच्या असल्याने हा फरक झाला असावा. आम्ही कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करू असेही ते म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरVidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूकPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाEVM Machineएव्हीएम मशीन