बारा वर्षानंतर सोलापूरच्या खेळाडूंनी मिळविले राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत तीन पदक

By Appasaheb.patil | Updated: February 27, 2023 22:25 IST2023-02-27T22:24:09+5:302023-02-27T22:25:40+5:30

तिसरी मिनी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा नुकतीच पार पडली.

after twelve years solapur athlete won three medals in the state level skating competition | बारा वर्षानंतर सोलापूरच्या खेळाडूंनी मिळविले राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत तीन पदक

बारा वर्षानंतर सोलापूरच्या खेळाडूंनी मिळविले राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत तीन पदक

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : तिसरी मिनी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा नुकतीच पार पडली. या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत विनर्स फाउंडेशन स्केटिंग क्लासमधील असित कांबळे, आर्य शीलवंत या खेळाडूंनी सिल्वर मेडल, ब्राँझ मेडल मिळविले. 

या स्पर्धेत असित कांबळे या खेळाडूने 7to9 एज ग्रुप एक राऊंड रेस व दोन राउंड रेसमध्ये दुसरा क्रमांक मिळवून दोन सिल्वर मेडल मिळविले, तर 
आर्य शीलवंत याने 4to5 एजग्रुप मध्ये एक राऊंड रेस व दोन राउंड रेस मध्ये तिसरा क्रमांक मिळवून दोन सिल्वर मेडल मिळविले. त्यांना सम्यक मोहोळकर व सागर राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. 

ह्या मुलाचे कौतुक करत नगरसेवक नागेश वल्याळ यांनी सत्कार केला. सोलापूर जिल्ह्याला बारा वर्षानंतर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पदक मिळवून सोलापूरचे नाव उंचावले आहे. हे खेळाडू वल्याळ मैदानावर सराव करीत होते. या यशाबद्द्दल यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: after twelve years solapur athlete won three medals in the state level skating competition