सावधान! वीज कर्मचाऱ्यांना मारहाण केली तर गाठावी लागेल थेट कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 23:35 IST2025-03-04T23:35:19+5:302025-03-04T23:35:30+5:30

वीज कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ व मारहाण होण्याच्या घटना घडल्यानंतर ग्राहकांवर गुन्हा दाखल केला जातो.

After incidents of harassment abuse and beating of electricity employees cases are filed against consumers | सावधान! वीज कर्मचाऱ्यांना मारहाण केली तर गाठावी लागेल थेट कोठडी

सावधान! वीज कर्मचाऱ्यांना मारहाण केली तर गाठावी लागेल थेट कोठडी

सोलापूर : वीजबिलाची थकबाकी वसुली, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे, वीज मीटर काढल्यानंतर अभियंते व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करण्याच्या घटना घडल्या. वीजचोरी शोध मोहीम, थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर अनधिकृत अथवा चोरट्या मार्गाने चोरट्या पानि गजपुरवठा सुरू आहे प्रकार सोलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या विविध भागात घडले आहेत.

वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणकडून ग्राहकांना थकीत वीज बिल भरण्यासाठी सातत्याने आवाहन केले जाते. एखाद्या महिन्याचे बिल भरलेले नसल्यास पहिल्यांदा ग्राहकाला बिल भरण्याचा मेल, मेसेज केला जातो. दुसऱ्यांदा वीज तोडण्याची नोटीस दिली जाते. त्यानंतरही बिल न भरल्यास तिसऱ्यांदा वीजजोडणी तोडण्यासह मीटर जप्तीची कारवाई केली जाते. बिल पूर्ण भरल्यानंतरच पुन्हा जोडणी दिली जाते. मात्र, या प्रक्रियेत कारवाई करण्यासाठी दाखल वीज कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ व मारहाण होण्याच्या घटना घडल्यानंतर ग्राहकांवर गुन्हा दाखल केला जातो.

तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद
 
संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाईसाठी उच्च स्तरावरून व विधी विभागाकडून पाठपुरावा करण्यात येतो. कर्मचाऱ्यांना मारहाण व धक्काबुक्की प्रकरणांत आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात. विविध कलमांनुसार दोन ते दहा वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

काय होते कारवाई ?
पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांकडून सरकारी कामात अडथळा तत्कालिन भारतीय दंड संहितेच्या ३५३ या कलमासह घटनेच्या अनुषंगाने तक्रार दिली जात होती. आता भारतीय न्याय संहिता बीएनएस कलमान्वये तक्रार देण्यात येत आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करत कारवाई केली जाते.

पाठपुरावा अन् संघटना होतात आक्रमक
मारहाण, दमदाटी किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना दिल्यास त्या घटनांमध्ये आरोपींविरुद्ध कारवाई व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येतो. कर्मचारी संघटनाही कारवाईसाठी भूमिका घेतात. घटनांबाबत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. अपवाद वगळता सर्व प्रकरणांमध्ये अटकेची कारवाई होते.

Web Title: After incidents of harassment abuse and beating of electricity employees cases are filed against consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.