शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही पुण्याहून आलोय,’ ऐकताच हातातील काम सोडून  महापालिका कर्मचारी एकेक करत पडू लागले बाहेर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:42 IST

जन्म-मृत्यू दाखल्यासाठी पुणेरी सोलापूरकरांची गर्दी; उपायुक्तांनी समजूत काढल्यावर कर्मचाºयांनी कामास केली सुरुवात

ठळक मुद्देमहापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात सोलापूरकरांची गर्दी एनआरसीच्या धसक्यामुळे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात जन्म दाखले काढण्यासाठी गर्दी पाच हजारांहून अधिक अर्ज आले आहेत, कोरोनामुळे पुण्यातील बहुतांश व्यवहार ठप्प

राकेश कदम 

सोलापूर : महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात सोमवारी दुपारी सोलापूरकरांची गर्दी झाली. गर्दीतली बहुतांश मंडळी पुणेरी सोलापूरकर होते. ‘मी पुण्याहून आलोय.. असे अनेकांचे सूर कानी पडताच एकेक कर्मचारी कार्यालयाबाहेर पडले. कोरोनाच्या धसक्यामुळे कर्मचाºयांनी अचानक काम करण्यास नकार दिला. उपायुक्त अजयसिंह पवार यांनी कर्मचाºयांची समजूत काढल्यानंतर काम सुरू झाले. 

एनआरसीच्या धसक्यामुळे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात जन्म दाखले काढण्यासाठी गर्दी वाढली आहे. पाच हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. कोरोनामुळे पुण्यातील बहुतांश व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे पुण्यात राहणारे सोलापूरकर परतले आहेत. जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात सोमवारी गर्दी होती. कर्मचारी मास्क लावून काम करीत होते. गर्दी पाहून महिला कर्मचारी काम करायला नकार देत होत्या. त्यातच दुपारी काही लोक आम्ही पुण्यातून आलोय. परत जाण्यापूर्वी आम्हाला दाखले द्या, असे सांगू लागले. हे बोलणे कर्मचाºयांनी ऐकले. कुजबूज सुरू झाली आणि कर्मचारी बाहेर आले. उपनिबंधक संदीप कुरडे यांच्यासह कर्मचाºयांनी उपायुक्त अजयसिंह पवार यांचे कार्यालय गाठले. गर्दी कमी करण्यासाठी तातडीने उपाय करु, असे उपायुक्तांनी सांगितले. त्यानंतर कर्मचारी परतले.

कार्यालयाची जागा बदलण्याची तयारी- जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील गर्दी आणि कर्मचाºयांचे हाल याबद्दल ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगरसेवक बाबा मिस्त्री, माजी महापौर आरिफ शेख, एमआयएमचे गटनेते रियाज खरादी आदींनी  सायंकाळी आयुक्त दीपक तावरे यांची भेट घेतली. कार्यालयातील जागा अपुरी पडू लागल्याने कौन्सिल हॉलमधील एलबीटी कार्यालयात जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय हलवण्याचा विचार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अभिलेखापाल कार्यालय आहे त्या ठिकाणी राहील. १९९१ नंतरचे रेकॉर्ड आणि दाखले देण्याची व्यवस्था नव्या जागेत ठेवू. लवकरच निर्णय घेऊ, असे आयुक्त तावरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोनाHealthआरोग्य