शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:32 IST

जाणून घ्या कोणत्या शाखेला किती जागा उपलब्ध ?

ठळक मुद्देअकरावी प्रवेशासाठीचे अर्ज हे १२ ते २४ जूनदरम्यान महाविद्यालयात देण्यात येणारइंटरनेटवरुन काढण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार प्रवेश प्रक्रियेचे अर्ज देण्यात येणार २८ ते ३० जूनदरम्यान महाविद्यालयीनस्तरावर अर्जांची छाननी करण्यात येणार

सोलापूर : शहर व जिल्ह्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला १२ जूनपासून सुरुवात होत आहे. शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी ही माहिती दिली. वालचंद महाविद्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

अकरावी प्रवेशासाठीचे अर्ज हे १२ ते २४ जूनदरम्यान महाविद्यालयात देण्यात येणार आहेत. इंटरनेटवरुन काढण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार प्रवेश प्रक्रियेचे अर्ज देण्यात येणार आहेत. २४ ते २८ जूनदरम्यान भरलेले अर्ज महाविद्यालयात जमा करायचे आहेत. यावेळी दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत देणे गरजेचे आहे. २८ ते ३० जूनदरम्यान महाविद्यालयीनस्तरावर अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

 पहिली गुणवत्ता यादी २ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना २ ते ५ जुलैदरम्यान प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश घेताना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला सादर करायचा आहे.

दुसरी गुणवत्ता यादी ८ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी ८ ते १० जुलैदरम्यान प्रवेश घ्यायचा आहे. जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी ११ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आहे. तिसºया गुणवत्ता यादीनुसार ११ ते १३ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

महाविद्यालयीनस्तरावरील प्रवेश प्रक्रिया १३ जुलैला समाप्त करण्यात येणार आहे. १५ जुलैपासून महाविद्यालये नियमितपणे सुरु होणार आहेत. प्राचार्यांच्या अधिकारात असलेल्या रिक्त जागांवरील प्रवेश हे २५ जुलैपर्यंत सुरु असणार आहेत. 

शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा उपलब्ध जागांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रवेश घेताना अडचण येणार नाही. मात्र यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी विशिष्ट अशा महाविद्यालयातच प्रवेश घेण्याचा हट्ट सोडायला हवा. एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.या बैठकीस शिक्षण उपनिरीक्षक मिलिंद मोरे, वालचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय शहा, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते. 

सोलापूर जिल्ह्यातील शाखानिहाय उपलब्ध जागा

  • - कला - २८ हजार ६८०
  • - विज्ञान - २० हजार ९६०
  • - वाणिज्य - ६ हजार ९६०
  • - संयुक्त शाखा - २ हजार ४४०
  • - एकूण जागा - ५९ हजार ४०
  • - उत्तीर्ण विद्यार्थी संख्या - ५२ हजार ५९६
टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी