शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
6
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
7
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
8
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
9
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
10
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
11
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
12
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
13
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
14
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
15
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
16
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
17
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
18
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
19
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
20
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

राज्यातील नगरपालिकांची प्रशासकीय यंत्रणा खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 5:45 PM

२६०० हून अधिक पदे रिक्त, समन्वय समितीने दिला आंदोलनाचा इशारा

ठळक मुद्दे राज्यातील ३३० नगरपालिकांमध्ये २६०० हून अधिक पदे रिक्तसातवा वेतन आयोग लागू करण्यासह २७ मागण्या प्रलंबित९ आॅगस्टपासून राज्यातील नगरपालिकांसमोर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय

सोलापूर : थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेणाºया फडणवीस सरकारने राज्यातील नगरपालिकांच्या प्रशासकीय सेवांकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचारी संघटना करीत आहेत. राज्यातील ३३० नगरपालिकांमध्ये २६०० हून अधिक पदे रिक्त आहेत. सातवा वेतन आयोग लागू करण्यासह २७ मागण्या प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर ९ आॅगस्टपासून राज्यातील नगरपालिकांसमोर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीने जाहीर केला आहे. 

राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ४५ टक्के लोकसंख्या ही नागरी विभागात येत असल्याचे नगरविकास विभागाची आकडेवारी सांगते. या लोकांच्या दैैनंदिन गरजांशी संबंधित विभाग म्हणून महानगरपालिका आणि नगरपालिकांकडे पाहिले जाते. या नागरी भागात राहणारी मंडळीच भाजपाचा मतदार असल्याचे विविध निवडणुकांमधून स्पष्ट झाले आहे. ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवूनच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. पण या नगरपालिकांमधील प्रशासकीय सेवा मजबूत करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.

 नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे प्रदेश सचिव सुनील वाळूंजकर (पंढरपूर) म्हणाले की, राज्यातील एकूण ३३० नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये जवळपास २६०० पदे रिक्त आहेत. कर संकलन, लेखापरीक्षक, स्थापत्य संवर्ग यात सर्वाधिक जागा रिक्त आहेत. एकेका कर्मचाºयाकडे तीन ते चार विभागांचा पदभार आहे. शासनाने मे महिन्यात या पदभरतीसाठी परीक्षा घेतली. परंतु, अद्यापही त्यासंदर्भात पुढे काय हे कळायला मार्ग नाही. सफाई कर्मचाºयांसह इतर कर्मचाºयांवर कामाचा प्रचंड ताण आहे. आमच्या २७ मागण्या प्रलंबित आहेत. 

२० अधिकाºयांवर पालिकांचा कारभार- सोलापूर जिल्ह्यात १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायती आहेत. येथील आठ प्रमुख संवर्गासाठी एकूण १९३ पदे मंजूर आहेत. यातील १७३ पदे रिक्त आहेत. केवळ २० कर्मचाºयांवर १२ नगरपालिकांचा कारभार सुरु आहे. पंढरपूर, दुधनी, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा वगळता इतर नगरपालिकांमध्ये स्थापत्य अभियंताच नाहीत. तरीही शासन विकासाच्या गप्पा मारत आहे. अग्निशमन संवर्गात तर एकही पद भरण्यात आलेले नाही. वाहन चालकालाच सर्व कामे करावी लागत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील रिक्त पदे - जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कर आणि प्रशासकीय सेवा संवर्गात ६५ पैकी ५९ पदे रिक्त आहेत. लेखा व लेखापरीक्षक सेवा संवर्गात २९ पैकी २५ पदे रिक्त आहेत. स्थापत्य संवर्गात ३३ पैकी २७, पाणीपुरवठा संवर्गात १२ पैकी ९, विद्युत संवर्गात ८ पैकी ६ , संगणक संवर्गात १० पैकी ९, अग्निशमन संवर्गात १९ पैकी १९ पदे रिक्त आहेत. नगररचनाकार विभागात १९ पैकी १९ पदे रिक्त आहेत. 

शासनाने महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कामगार संघटनांच्या संघर्ष समितीसोबत आॅगस्ट २०१७ मध्ये बैठक घेतली होती. या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. पण अद्यापपर्यंत शासनाने एकही आदेश काढलेला नाही. कर्मचारी भरतीबरोबरच इतर मागण्याही आम्ही ठेवल्या आहेत. त्याबाबत निर्णय न झाल्यास ९ आॅगस्ट रोजी सर्व नगरपालिकांसमोर निदर्शने होतील. यानंतर २७ ते २९ आॅगस्ट असे तीन दिवस पालिकांचे काम बंद राहील. - सुनील वाळूंजकर, प्रदेश सचिव, नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय