शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात हयगय केल्यास होणार कारवाई - सुनील पावडे

By appasaheb.patil | Updated: June 11, 2019 13:26 IST

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणची काय यंत्रणा आहे याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे याच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.

ठळक मुद्दे पावसाळ्यात गंभीर बिघाड होऊन वीजप्रवाह बंद पडल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत - वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश

सोलापूर : पावसामुळे वीजयंत्रणेत मोठ्या प्रमाणात बिघाड होत असतो़ तत्पूर्वी संभाव्य बिघाड टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यात गंभीर बिघाड होऊन वीजप्रवाह बंद पडल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत़ वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना दिल्याची माहिती बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पावसाळ्यात अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर, पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. अशातच जोरदार पावसामुळे वीज यंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा बंद होण्याचे प्रमाण वाढत असते़ तत्पूर्वी अशा घटनांवर आळा घालण्यासाठी महावितरणकडून काय काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत व नागरिकांनी या काळात काय काळजी घ्यावी याबाबत बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.

प्रश्न : पावसाळ्यात विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होतो़ तो होऊ नये यासाठी महावितरणची यंत्रणा काय काय करणार आहे ?उत्तर : अतिवृष्टी, वादळी वाºयासह पडणाºया पावसामुळे विजेच्या तारा, वीजखांब पडण्याचे प्रमाण वाढते़ त्यामुळे त्या त्या भागातील वीजपुरवठा खंडित होत असतो़ वीजपुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीजप्रवाह सुरू करण्यासाठी महावितरणची विशेष टीम कार्यरत असणार आहे.

प्रश्न : तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास आपली काय यंत्रणा आहे ?उत्तर : वादळ तसेच पावसामुळे अथवा इतर तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्ती काम करून घेण्यासाठी संंबंधित अभियंत्यांची टीम काम करणार आहे़ दरम्यान, काम करण्यास वेळ लागत असल्यास आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करावा, असे निर्देश दिले आहेत.

प्रश्न : एखाद्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला तर तो कधी सुरू होणार आहे, किती वेळ लागणार आहे याबाबत वीजग्राहकांना काहीच माहीत नसते त्याबद्दल काय सांगाल ?उत्तर : जर एखाद्या भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास तर संबंधित त्या भागातील अभियंत्यांनी त्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना द्यावी़ शिवाय वीजग्राहकांसाठी महावितरणचे कॉल सेंटर २४ तास उपलब्ध असणार आहे त्यावरही ग्राहक तक्रार अथवा माहिती घेण्याची सोय उपलब्ध असणार आहे.

प्रश्न : पावसाळ्यात वीजग्राहकांनी काय काय काळजी घ्यावी?उत्तर : अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी़ तुटलेल्या, लोंबकळणाºया वीजतारांपासून सावध राहावे, पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, विशेषत: पत्र्याच्या घरात राहणाºया नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणRainपाऊसPower Shutdownभारनियमन