सोलापूर शहरात अवैध रिक्षा वाहतुकीवर कारवाई, १७ रिक्षांना ठोठावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 12:56 IST2018-09-15T12:53:59+5:302018-09-15T12:56:14+5:30

Action on illegal rickshaw transport in Solapur city, 17 ransom penalties | सोलापूर शहरात अवैध रिक्षा वाहतुकीवर कारवाई, १७ रिक्षांना ठोठावला दंड

सोलापूर शहरात अवैध रिक्षा वाहतुकीवर कारवाई, १७ रिक्षांना ठोठावला दंड

ठळक मुद्दे१७ रिक्षांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती शहर पोलीसांनी दिलीशहरात मागील काही दिवसांपासून अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढलेवाहतुक शाखा व आरटीओंच्या विशेष पथकाने यावर कारवाई करायला सुरूवात केली

सोलापूर : सोलापूर शहरात होत असलेल्या अवैध रिक्षा चालकांवर शनिवारी सकाळी रंगभवन चौकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे पथक व सोलापूर शहर पोलीस वाहतुक शाखेच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली़ या कारवाईत १७ अ‍ॅटोरिक्षांसह दुचाकीस्वारांना दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील विशेष पथक व सोलापूर शहर पोलीस दलातील वाहतुक शाखेकडील सपोनि चौगुले, पोसई चवरे, शवाशा कडील १२ कर्मचारी व आरटीओ पथक हजर होते.

सोलापूर शहरात मागील काही दिवसांपासून अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले होते़ त्यामुळे शहरातील मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी होत होती़ सातत्याने अवैध धंद्याविरोधात येत असलेल्या तक्रारीवरून वाहतुक शाखा व आरटीओंच्या विशेष पथकाने यावर कारवाई करायला सुरूवात केली़ शनिवारी १७ रिक्षांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती शहर पोलीसांनी दिली.

Web Title: Action on illegal rickshaw transport in Solapur city, 17 ransom penalties