सोलापूर-विजयपूर महामार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 13:14 IST2020-10-31T13:14:34+5:302020-10-31T13:14:37+5:30

अज्ञात वाहनाने दिली धडक; वांगी व वडकबाळ गावावर शोककळा

Accident on Solapur-Vijaypur highway; Both died on the spot | सोलापूर-विजयपूर महामार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

सोलापूर-विजयपूर महामार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

सोलापूर : सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी सातच्या सुमारास घडला.

दरम्यान, शेतमाल घेऊन शहरात विक्रीसाठी निघालेल्या मोटारसायकलस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिली़ या धडकेनंतर अज्ञात वाहनधारकाने पळ काढला़ या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात ठार झालेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले़ अपघात नेमका कसा झाला याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

Web Title: Accident on Solapur-Vijaypur highway; Both died on the spot