लांबोटीजवळ अपघात; आठ भाविक जखमी
By Appasaheb.patil | Updated: August 30, 2019 14:43 IST2019-08-30T14:33:53+5:302019-08-30T14:43:32+5:30
कुत्रे आडवे आल्याने रिक्षा झाली पलटी; जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू

लांबोटीजवळ अपघात; आठ भाविक जखमी
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील नागनाथ महाराजांचे दर्शन घेऊन येत असताना कुत्रे आडवे आल्यामुळे रिक्षा पलटी होऊन आठ भाविक जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास लांबोटीजवळ घडली.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, आज श्रावण अमावास्या असल्याने वडवळ नागनाथचे दर्शन घेऊन सोलापूरकडे येत असताना लांबोटीजवळील गौरी हॉटेलजवळ कुत्रे आडवे आल्याने रिक्षा पलटी होऊन रिक्षामधील आठ भाविक जखमी झाले आहेत़ ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. रिक्षामधील जखमींना तात्काळ उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची प्राथमिक नोंद सिव्हील पोलीस चौकीत करण्यात आली आहे.