शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

अबब.. ४० फूट विहिरीत आठ इंच पाण्याचे फवारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 14:54 IST

दयानंद कुंभार  रानमसले : बातमीचा मथळा वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असणार.. पण हे खरे आहे... उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरजमध्ये ...

ठळक मुद्देगावकºयांच्या श्रमदानाचा फायदाहिरजमध्ये वॉटर कप कामाची किमया चाळीस फूट खोलीदरम्यान एक इंचाचे दोन व दोन इंचाचा असे तीन झरे वाहत आहेत

दयानंद कुंभार 

रानमसले : बातमीचा मथळा वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असणार.. पण हे खरे आहे... उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरजमध्ये उत्तर सोलापूरपाणीपुरवठा विभागाच्या वतीने सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत ७ लाखांच्या योजनेतून नवीन विहीर, पंपगृह तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या विहिरीची गावालगत कोरड्या पाझर तलाव परिसरात खोदाई चालू आहे. चाळीस फूट खोलीदरम्यान एक इंचाचे दोन व दोन इंचाचा असे तीन झरे वाहत आहेत.

सध्या चाळीस फुटापर्यंत खोदाई गेली आहे़ सध्या या चाळीस फुटावर मोठ्या दाबाने चार इंच साईजचा झरा भरभरून वाहत आहे. सध्या विहिरीत २५ फुटापर्यंत पाणी असून, सध्या साडेसात एच.पी. व पाच एच.पी. विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा चाचणी घेतली आहे. तरीही पाणी पातळी ‘जैसे थे’ पाहावयास मिळत आहे. सध्या  या नवीन विहिरीपासून गाव विहिरीपर्यंत पाइपलाइन नसल्याने पाणी उपसा बंद ठेवला आहे. 

पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी...- सध्या ऐन दुष्काळी परिस्थितीत उत्तर सोलापूर तालुक्यात पाणी टंचाई जाणवत आहे, तर दुसरीकडे हिरजमध्ये पाण्याचा झरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे़ हे पाणी पाहण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून लोक गर्दी करत आहेत. गेल्या दोन वर्षांत पाणी फउंडेशन अंतर्गत हिरजच्या गावकºयांनी सहभाग घेऊन जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. यामुळेच पाणी पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत ७ लाखांच्या योजनेतून नवीन विहीर घेण्यात आली़ या विहिरीस पाणी मुबलक लागले आहे, मात्र पाइनलाइनअभावी याचा ग्रामस्थांना फायदा होत नाही. यासाठी पाइपलाइन तातडीने होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच लोकांसाठी पाणी वापर होईल़- नंदकुमार पाटील, ग्रामसेवक, हिरज

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीटंचाईWaterपाणीagricultureशेती