शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे अपहरणाचा डाव अखेर फसला; दोन तासाच्या आत अपहरणकर्ते जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 12:50 PM

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

अपहरण घटनेबाबत माहिती समजताचमंगळवेढा पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी  तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करून अपहरणकर्तेबाबत माहिती कळविताच दोन तासाच्या आत  अपहरणकर्तेना  चारचाकी गाडीसह जेरबंद करण्यात पोलिसांना  यश आले आहे. दरम्यान एसपी तेजस्विनी सातपुते यांच्या संकल्पनेतुन बसविण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सतर्कतेने अपहरणाचा प्रकार उघडकीस आला आहे. सांगोला तालुक्याच्या ग्रामीण भागातुन  एका व्यक्तीस  चारचाकी गाडीतून अपहरणाची घटना घडली. या घटनेबाबत  पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांना  माहिती समजताच त्यांनी तात्काळ अपहरणकर्त्यांच्या बलेनो कार विषयी  माहिती व वर्णन ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे 18002703600 या क्रमांकावर परिसरातील नागरिकांना दिली.  सदरचा कॉल मंगळवेढा व सांगोला पोलीस  स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांच्या तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या  मोबाईलवर प्रसारित झाला.

दरम्यान पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे हे आपल्या सहकाऱ्यांसह  मिळालेल्या माहितीनुसार मंगळवेढावरून सांगोला तालुक्याच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी या  मार्गाकडे जाणाऱ्या काही  नागरिकानी  हा संदेश ऐकला आणि संदेशात ऐकल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वर्णनाची कार भिकारअकोले या गावाजवळ  नागरिकांनी रस्त्यावर येऊन  अडवण्याचा प्रयत्न केल्याने अपहरणकर्ते जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलीस दलास यश आले. या कारमध्ये तिघेजण होते यातील एकजण पळून गेला होता. त्याला दामाजी चौकात पकडण्यात आले. दरम्यान एसपी तेजस्विनी सातपुते यांच्या संकल्पनेतुन काही दिवसांपूर्वी मंगळवेढा तालुक्यात सदर अत्याधुनिक ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

 पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तासाच्या आत अपहरणकर्तेना  जेरबंद करण्यात मंगळवेढा व सांगोला पोलिसांना यश आले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस