अकोला जिल्ह्यात अपहरण; पंढरपूर पोलीसांनी केली व्यवसायिकाची सुटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 08:30 AM2021-02-23T08:30:55+5:302021-02-23T08:31:29+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Abduction in Akola district; Pandharpur police release businessman | अकोला जिल्ह्यात अपहरण; पंढरपूर पोलीसांनी केली व्यवसायिकाची सुटका 

अकोला जिल्ह्यात अपहरण; पंढरपूर पोलीसांनी केली व्यवसायिकाची सुटका 

Next

पंढरपूर : अकोला जिल्हयातील हिवरखेड येथुन एका ५४ वर्षीय व्यवसायिकास सहा लाख रूपये खंडणीसाठी अपहरण झाले होते. अपहरण झालेल्या सुरेश कृष्णाप्पा मोदे या व्यवसायिकाची सुटका करून एकास ताब्यात घेण्याची कारवाई पंढरपूर पोलिसांनी केली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश कृष्णाप्पा मोदे यांचे आठ दिवसापुर्वी एक चारचाकी गाडीसहीत अपहरण केले होते. या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात राजाभाऊ इंगळे (वय ५५ रा. छोटेवाडी ता. माजलगाव, जिल्हा : बीड) व त्याच्या  इतर साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयातील आरोपी अपहरण केलेल्या व्यक्तींना घेवून बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्हयात घेवून फिरत आहेत अशी माहिती पोलीसांना मिळाली.


उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण पवार पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांनी तीन पथके तयार केली.  या पथकामध्ये सपोनि राजेंद्र मगदुम, सपोनि मिठु जगदाळे, पोउनि प्रशांत भागवत, पोलीस कर्मचारी पाटील, पोना  पवार यांचा सहभाग होता. 

या पथकानी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचला. व राजाभाऊ इंगळे याला अपहरण केलेल्या व्यक्तीस गाडीसह  ताब्यात घेतले. सुरेश कृष्णाप्पा मोदे यांची  सुटका करण्यात आली आहे. 

आणखी लोकांचा शोध सुरू

सुरेश कृष्णाप्पा मोदे या व्यापाऱ्यांचे अपहरण झाले होते. त्यांची सुटका केली आहे. तर या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या राजाभाऊ इंगळेला हिवरखेड पोलीस ठाण्याचे पोउपनि विठ्ठल वाणी यांचेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. या अपहरण प्रकरणात आणखी किती लोक आहेत. याचा शोध घेण्याचे काम सुरू राहणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम यांनी सांगितले.

Web Title: Abduction in Akola district; Pandharpur police release businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.