Abasaheb Ghadge unopposed as Sarpanch | वरवडे सरपंचपदी आबासाहेब घाडगे बिनविरोध

वरवडे सरपंचपदी आबासाहेब घाडगे बिनविरोध

वरवडे ग्रामपंचायतीत ९ जागेसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये वरवडे महाविकास आघाडीने ९ पैकी ७ उमेदवार निवडून आले. सरपंचपद सर्वसाधारणसाठी आरक्षित असल्याने सर्वानुमते सर्वसाधारण ४ सदस्यांपैकी आबासाहेब घाडगे यांची सरपंचपदी तर सिद्धेश्वर भोसले यांची उपसरपंचपदासाठी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी नूतन सदस्य नागनाथ पाटील, रविकांत मेनकुदळे, सिंधू पाटील, सुरेखा कसबे, रेखा पखाले, राजाबाई गायकवाड उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बागल, तलाठी बोराटे व ग्रामसेवक मोहिते यांनी काम केले.

या प्रसंगी वरवडे महाविकास आघाडीचे शिवाजी गायकवाड, गणेश गायकवाड, सुनील गायकवाड, महादेव घाडगे, नवनाथ घाडगे, प्रदीप वजाळे, महावीर बनसोडे, रमेश पाटील, अनिल गायकवाड, नागनाथ गायकवाड राजाभाऊ गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडीनंतर गावातून फटाक्याची आतिशबाजी व गुलालाची मुक्त उधळण मिरवणूक काढण्यात आली.

----

फोटो : २४ बाबासाहेब घाडगे/ २४ सिद्धेश्वर भोसले

--

Web Title: Abasaheb Ghadge unopposed as Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.