शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

अबब़़...तब्बल अडीच लाखांचा बैल, सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील जनावर बाजारात लाखोंची उलाढाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 2:04 PM

सोलापूर - विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ भरविण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे २५ हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत़ यात खिलार गाय-बैलांसह मुरा, खोंड, गीरगाय, गवळार जातीच्या व जाफराबादी म्हशींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

ठळक मुद्दे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेत होम मैदानावर कृषी प्रदर्शन जनावर बाजारात मंदिर समितीच्यावतीने शेतकºयांसाठी विविध सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़यंदा खिलार बैल व जाफराबादी म्हशीला चांगली मागणी आहे़ या दोघांच्या किमती जास्त आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने सोलापूर - विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ भरविण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे २५ हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत़ यात खिलार गाय-बैलांसह मुरा, खोंड, गीरगाय, गवळार जातीच्या व जाफराबादी म्हशींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या बाजारात लाखोंची उलाढाल होत असून, ही उलाढाल आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या बाजारात अडीच लाखांच्या खिलार बैलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे़  सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेत होम मैदानावर कृषी प्रदर्शन भरविले जाते़ या प्रदर्शनात शेतीचे उत्पादन वाढविण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचे विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे़ याशिवाय यात्रेनिमित्त रेवणसिध्देश्वर मंदिराजवळील १० ते २० एकरात जनावरांचा बाजार भरविण्यात आलेला आहे़ या बाजारास १० जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे़ मागील वर्षापेक्षा यंदाच्या जनावरांच्या बाजारास नागरिक, शेतकºयांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यंदाचा जनावरांचा बाजार हाऊसफुल्ल झाला आहे. या बाजारात १० हजारांपासून ते अडीच ते चार लाखांपर्यंतची जनावरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ मागील वर्षीपेक्षा यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे़ या पावसामुळे चाºयाचा प्रश्न मिटला आहे़ यामुळे दूध देणाºया म्हशी, गायी विक्रीचे प्रमाण कमी आहे़ मात्र ज्या गायी, म्हशी बाजारात दाखल झालेल्या आहेत त्यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत़ एक म्हैस १५ हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत विक्री होत आहे़ हा बाजार रेवणसिध्देश्वर मंदिर परिसर ते मोदीच्या रेल्वे बोगद्यापर्यंत भरलेला आहे. कर्नाटक, मराठवाडा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तसेच विविध भागातील शेतकरी वर्ग जनावरे विक्रीस आणली आहेत. यंदाच्या जनावरांच्या बाजारात विविध प्रकारचे बैल, खोंड, गाय, जर्सी गाय, तांबड्या रंगाची गीर गाय, म्हशीमध्ये-पंढरपुरी म्हशी, गेरू, जाफराबादी म्हैस ही साधारतण :  १२ लिटर दूध देते़ या म्हशीची अंदाजे किंमत २५ हजारांपासून ते ७५ हजारांपर्यंत आहे़ जाफराबादी म्हशीला बाजारात मागणी फार आहे तसेच विविध प्रकारची जनावरे विक्रीस आली आहेत़ जनावरांच्या बाजारात जनावरास काय इजा झाल्यास दवाखान्याची सोय आहे. त्याचबरोबर आलेल्या शेतकºयांसाठी चहापाणीसाठी हॉटेल, फळविक्रेते आणि खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल याठिकाणी आहेत़ जनावरांसाठी पाण्याबरोबर चाºयाची व्यवस्थादेखील करण्यात आलेली आहे़ सकाळी सहापासून ते रात्री उशिरापर्यंत जनावरांचा बाजार सुरूच असतो. याठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. --------------------या बैलाने वेधले सर्वांचेच लक्ष- सिध्देश्वर यात्रेनिमित्त रेवणसिध्देश्वर मंदिराजवळ भरविण्यात आलेल्या बाजारात तब्बल अडीच लाखांच्या बैलाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे़ कारंबा (ता़ उ़ सोलापूर) येथील शेतकरी नागनाथ बन्ने यांच्या मालकीचा हा बैल आहे़ या बैलाचे खास वैशिष्ट्य म्हणजे दिसायला मोठा दिमाखदार, देवाचे मंदिर पाहिले की खाली झुकून पाया पडणारा आहे़ या बाजारात हलगीच्या तालावर या बैलाने पाया पडतानाचे चित्र अनेक शेतकºयांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे़ शिवाय सोशल मीडियावरही या बैलाने चांगलीच क्रेझ निर्माण केली आहे़ या बैलासमवेत शेतकरी नागनाथ बन्ने, संजय गायकवाड, दत्तोबा गुंड, तम्मा बर्हिजे, शेतकरी आदी उपस्थित होते़ ------------------यंदाच्या जनावर बाजारात मागील वर्षीपेक्षा जास्त जनावरे दाखल झाली आहेत़ यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ होत आहे़ बाजारात विविध जातीचे बैल, म्हशी दाखल झाल्या आहेत़ १० हजारांपासून ते चार लाखांपर्यंतची जनावरे बाजारात विक्रीसाठी आली आहेत़- आप्पासाहेब दत्तोबा गुंड, शेतकरी, उत्तर सोलापूरयंदा रेवणसिध्देश्वर मंदिरासमोर भरविण्यात आलेल्या जनावर बाजारात मंदिर समितीच्यावतीने शेतकºयांसाठी विविध सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़ बैल, खोंड, गाय, जर्सी गाय, तांबड्या रंगाची गीर गाय आदी प्रकारची जनावरे विक्रीसाठी दाखल झालेली आहेत़ यंदा खिलार बैल व जाफराबादी म्हशीला चांगली मागणी आहे़ या दोघांच्या किमती जास्त आहेत़- समाधान सूर्यभान गायकवाड, शेतकरी, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूर