सोलापुरात हायवेवर बाईकनं पाठिमागून धडक दिल्यानं उत्तरप्रदेशचा तरुण ठार
By विलास जळकोटकर | Updated: December 14, 2023 17:27 IST2023-12-14T17:27:08+5:302023-12-14T17:27:18+5:30
अजय झीनक चौहान (वय- ३१, रा. मिश्रोलिया, बैमालपुरा, ता. रुद्रपूर जि. देवलिया, उत्तर प्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे.

सोलापुरात हायवेवर बाईकनं पाठिमागून धडक दिल्यानं उत्तरप्रदेशचा तरुण ठार
सोलापूर : क्रॉसरोडवर थांबलेल्या तरुणाला पाठिमागून येणाऱ्या बाईकस्वारानं जोराची धडक दिल्याने तरुण रोडवर पडून गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच तो ठार झाला. सोलापूर-पुणे हायवेवरील पाकणी फाटा येथे हा अपघात झाला. गुरुवारी पहाटे डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. अजय झीनक चौहान (वय- ३१, रा. मिश्रोलिया, बैमालपुरा, ता. रुद्रपूर जि. देवलिया, उत्तर प्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे.
यातील मयत तरुण हा बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास सोलाूर-पुणे हायवेवरील चिंचोळी एमआयडीसीजवळील पाकणी फाटा क्रॉस रोडवर थांबलेला होता. दरम्यान, पाठिमागून एम. एच. १३ डी एस ४५८० या दुचाकीस्वाराने मयत अजय याला जोराची धडक दिल्याने तो रोडवर कोसळला. यात त्याच्या डोक्यासह सर्वांगास गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला.
या अपघाताची खबर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला देण्यात आली. हवालदार लोखंडे यांनी त्याला यादीसोबत येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद झाली आहे.