शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

युवा कवीची बाईकचोरी..चोरांसाठी कविता.. कधी दिसली तर माझ्याकडं वळून बघू द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:01 IST

सोशल मीडियावर भावना व्यक्त : सव्हिंसिंग राहून गेलं

सोलापूर : एखाद्याला एखादी वस्तू क्षुल्लक वाटत असते, तर एखाद्याच्या आयुष्यात त्या वस्तूची किंमत ही जिवापेक्षा जास्त असते. शहाजी कांबळे या तरुणाच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची असलेली त्याची दुचाकी चोरीला गेली. आधीच आर्थिक संकटात असलेल्या या हळव्या तरुणाने चोराला शिव्या न देता, गाडीला जास्त त्रास देऊ नको, कधी रस्त्यात दिसली, तर एकदा माझ्याकडे वळून बघू दे, अशी विनंती सोशल मीडियावर केली.

शहाजी कांबळे हा तरुण सलगर वस्ती येथे राहतो. २०१२ मध्ये त्याने दुचाकी सेकंड हँड घेतली होती. ८ मार्च रोजी रात्री तो काळजापूर मारुती येथे पत्नीसह दर्शनासाठी आला होता. दर्शन झाल्यानंतर बाहेर आला, पाहतो तर काय? दुचाकी चोरीला गेली. कुणीतरी चुकून नेली असेल, असे वाटले. म्हणून, वाट पाहिली. पण, गाडी परत घेऊन कुणी आले नाही.

वाट पाहून शेवटी त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. पण, खिशात फक्त ५० रुपये असल्याने रिक्षा करता येणे शक्य नव्हते. म्हणून, आईसक्रीम खात काळजापूर मारुती मंदिर ते सलगर वस्तीपर्यंत चालत गेले.

तिने माफ करावं

माझ्याकडून तिची सेवा झाली नाही, तिने मला माफ करावं. चोरट्याला विनंती आहे की, तिला जास्त त्रास देऊ नये. ती खूप प्रामाणिक आहे. तिची काळजी घ्यावी. कधी मला ओळखलंच, तर तिला एकदा माझ्याकडे वळून बघू द्या. एकांतात केलेल्या प्रवासाची आठवण तिला होऊ द्या.चोरीला गेलेल्या दुचाकीने अनेक अडचणीत साथ दिली होती. आता ती नसल्यामुळे खूप त्रास होत आहे. अजून तरी पोलिसात तक्रार दिली नाही. मी शासकीय तंत्रनिकेतन येथे कंत्राटी पद्धतीने कामाला असून, रोज रिक्षाने येण्या-जाण्यासाठी २०० रुपयांचा खर्च होत आहे.

शहाजी कांबळे, तरुण कवी

या शब्दात मांडल्या भावना

गाडी गेली याचं दुःख नाही, पण गाडीने माझ्यासोबत लय दुःख भोगलं. माझ्या सर्व दुःखात तिने खांद्याला खांदा लावून साथ दिली. कधी धोका नाही दिला. कधी ऐनवेळी पंक्चर झाली नाही. माझ्याकडून सव्र्व्हिसिंग करायची राहून गेली. प्रत्येकवेळी म्हणणार पगार झाल्यावर करू, पुढच्या पगारीला करू, पण तिची सेवा करायची संधी मिळाली नाही. तिने खूप समजून घेतलं मला, माझ्या परिस्थितीला. मी कुठं जाऊन फिरत होतो. कुठं जाऊन रडत होतो, कुणासाठी रडत होतो, तिला सगळं माहीत आहे. पण, ती बोलली नाही.

टॅग्स :Solapurसोलापूर