तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार; सात जणांवर गुन्हा
By रूपेश हेळवे | Updated: June 20, 2023 16:58 IST2023-06-20T16:58:26+5:302023-06-20T16:58:35+5:30
रागाने पाहिल्याच्या कारणावरून फिर्यादी विकास यांना समाधान सरवदे व किरण सरवदे या दोघांनी लाकडाने डोक्यात मारून जखमी केले.

तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार; सात जणांवर गुन्हा
सोलापूर : रागाने पाहिल्याच्या कारणावरून तरूणाला मारहाण करत त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याप्रकरणी सात जणांवर फौजदार चवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विकास उर्फ पप्पू सुरेश दोरकर (वय २८, रा. गणेश नगर बाळे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १८ जून रोजी रात्री अंबिकानगर एम. एस. ई. बी ऑफिस समोर घडली.
रागाने पाहिल्याच्या कारणावरून फिर्यादी विकास यांना समाधान सरवदे व किरण सरवदे या दोघांनी लाकडाने डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर आरोपी बापू सरवदे याने दगड फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर सुनील भोसले, बाबा भोसले, मोहन शिंदे यांनी रिक्षा मधून खाली उतरून फिर्यादीला छातीस व पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी केली. दरम्यान व्यंकटेश याने त्याच्याकडील असलेले ब्लेडने विकासाच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद दोरकर यांनी दिली आहे. या घटनेचा तपास पोसई भोईटे करीत आहेत.