उड्डाणपुलावरून राँग साईडने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्यानं तरुण जखमी
By विलास जळकोटकर | Updated: August 14, 2023 18:53 IST2023-08-14T18:53:38+5:302023-08-14T18:53:48+5:30
जखमी तौफिक शेख हा तरुण दुचाकीवरून मोहोळ येथील काम आटोपून सोलापूरकडे येत होता.

उड्डाणपुलावरून राँग साईडने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्यानं तरुण जखमी
सोलापूर : मोहोळ जवळील उड्डाणपुलावरून राँगसाईडनं येणाऱ्या दुचाकीस्वारानं दुसऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तौफिक दावल शेख (वय १८, रा. नई जिंदगी, सोलापर) हा तरुण दुचाकीस्वार जखमी झाला. सोमवारी दुपारी साडेचाराच्या सुमारास ही घटना घडली. यातील जखमी तौफिक शेख हा तरुण दुचाकीवरून मोहोळ येथील काम आटोपून सोलापूरकडे येत होता.
समोरून राँगसाईडने येणाऱ्या दुचाकीस्वारानी वेगानं येऊन तौफिकला धडक दिली. यामध्ये त्याच्या सर्वांगाला मुक्कामार लागला. उजव्या पायाला जखम झाली. मोहोळच्या सरकारी दवाखान्यात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दुपारी दोन वाजता वडील दावल शेख यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.