रस्त्यावरील पोलला धडकल्याने तरुणाचा मृत्यू

By रूपेश हेळवे | Updated: January 5, 2023 16:46 IST2023-01-05T16:45:47+5:302023-01-05T16:46:31+5:30

मयत नागेश हा खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता.

A young man died after hitting a pole on the road | रस्त्यावरील पोलला धडकल्याने तरुणाचा मृत्यू

रस्त्यावरील पोलला धडकल्याने तरुणाचा मृत्यू

सोलापूर : हैदराबाद रोडवरील कुंभारी जवळील हॉटेलच्या समोरील पोलला धडक बसल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. नागेश सुरेश श्रीमुंडी ( वय २४, रा. मदर इंडिया झोपडपट्टी ) असे मयत तरुणाचे नाव आहे. अशी माहिती मयताच्या भावाने दिली.

मयत नागेश हा खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता. तो काल सायंकाळी येथून जाताना त्याचा अपघात झाला. यात तो जागीच बेशुद्ध झाला. त्याला ॲम्बुलन्सच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात लादेन यांनी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

Web Title: A young man died after hitting a pole on the road