गरम चहा अंगावर ओतून थाळींन महिलेला बेदम मारहाण

By दिपक दुपारगुडे | Updated: August 27, 2023 18:23 IST2023-08-27T18:23:24+5:302023-08-27T18:23:38+5:30

दीपक दुपारगुडे   सोलापूर : किरकोळ कारणावरुन नवऱ्यासह अन्य एका महिलेनं मिळून पल्लवी भाऊसाहेब बाबर (वय- ३५, रा. आलेगाव, वाघमोडेवाडी, ...

A woman was brutally beaten with a plate after pouring hot tea on her body | गरम चहा अंगावर ओतून थाळींन महिलेला बेदम मारहाण

गरम चहा अंगावर ओतून थाळींन महिलेला बेदम मारहाण

दीपक दुपारगुडे  

सोलापूर : किरकोळ कारणावरुन नवऱ्यासह अन्य एका महिलेनं मिळून पल्लवी भाऊसाहेब बाबर (वय- ३५, रा. आलेगाव, वाघमोडेवाडी, ता. सांगोला) या महिलेच्या अंगावर गरम चहा अंगावर ओतून भांड्यानं, ुलाथाबुक्क्यानं बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत महिलेला रविवारी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

यातील भाजलेली महिला पल्लवी बाबर हिचे घरगुती कारणावरुन राहत्या घरी शुक्रवारी नवऱ्याशी भांडण झाले. यामुळे रागावलेल्या नवऱ्यानं आणि महिलेनं मिळून पातेल्यातील गरम चहा तिच्या अंगावर ओतला. भांड्यानं बेदम मारहाण केली. गरम चहा अंगावर ओतल्यानं जखमी पल्लवी हिच्या पोटावर व सर्वांगाला जखम झाली.

जखमी अवस्थेत तिला सांगोल्यातील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रविवारी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ती शुद्धीवर असून, सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: A woman was brutally beaten with a plate after pouring hot tea on her body