सोलापुरात बाईक स्पीडब्रेकवर आदळल्यानं महिलेचा रोडवर पडून मृत्यू

By विलास जळकोटकर | Updated: December 14, 2023 18:46 IST2023-12-14T18:46:25+5:302023-12-14T18:46:41+5:30

आडवी आलेली रिक्षा चुकवताना झाला अपघात.

A woman fell down on the road and died after her bike hit the speed braker in Solapur | सोलापुरात बाईक स्पीडब्रेकवर आदळल्यानं महिलेचा रोडवर पडून मृत्यू

सोलापुरात बाईक स्पीडब्रेकवर आदळल्यानं महिलेचा रोडवर पडून मृत्यू

सोलापूर : रेल्वे स्टेशनकडे दुचाकीवरुन डबलसीट जात असताना समोर आडवी आलेल्या रिक्षा चुकवताना स्पीडब्रेकरवड दुचाकी आदळल्याने महिला रोडवर पडून गंभीर जखमी झाली. बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान गुरुवारी गुरुनानक चौकात हा अपघात झाला. नागमणी सिद्राम पोबत्ती (वय- ४८, रा. लक्ष्मी नगर, नल्ला वस्ती, सोलापूर) असे मयत महिलेचे नाव आहे.

यातील मयत महिला ही गुरुवारी लक्ष्मी नगर येथील राहत्या घरापासून रेल्वेस्टेशनकडे दुचाकीवरुन डबलसीट चाललेली होती. दुचाकी गुरुनानक चौकात आल्यानंतर दुचाकीस्वाराकडून समोरुन येणाऱ्या रिक्षाला चुकवण्याच्या प्रयत्नात स्पीडब्रेकरवरुन दुचाकी आदळली. यात दुचाकीवर मागे बसलेल्या नागमणी पोबत्ती या रोडवर पडून गंभीर जखमी झाल्या. यात त्यांची शुद्ध हरपली. बेशुद्धावस्थेत त्यांचा मुलगा इरेश याने येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. रोडवर पड

Web Title: A woman fell down on the road and died after her bike hit the speed braker in Solapur