रस्ता पार करणाऱ्या महिलेला कारने उडवलं; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
By विलास जळकोटकर | Updated: March 27, 2023 17:57 IST2023-03-27T17:57:03+5:302023-03-27T17:57:45+5:30
शांताबाई काशिनाथ चौगुले (वय- ७०, रा. नंदगाव, ता. तुळजापूर) असे मयतेचे नाव आहे.

रस्ता पार करणाऱ्या महिलेला कारने उडवलं; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
विलास जळकोटकर
सोलापूर : हायवेवर रस्ता पार करीत असताना अचानक काळ बनून कार आली अन् क्षणार्धात वृद्धेला उडवलं. यात तिच्या कमरेचं हाड मोडल्यानं रुग्णालयात नेलं. मात्र, दुर्दैव उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावरील जळकोटजवळ ही घटना घडली. शांताबाई काशिनाथ चौगुले (वय- ७०, रा. नंदगाव, ता. तुळजापूर) असे मयतेचे नाव आहे.
यातील वृद्धा जळकोट गावी कामानिमत्त आली होती. काम आटोपून नंदगाव मोडकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना उमरगा गावाच्या दिशेने भरधाव वेगानं कार (एमएच १२ क्यू जी ९०१) आली. रस्त्याच्या मध्यावर आलेल्या वृद्धेला धडक देऊन उडवलं. यात तिच्या कमरेचं हाड मोडलं. सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. तिला नातलग सुनीता होनाजे हिने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच ती मयत झाली. सिव्हील पोलीस चौकीत याची नोंद आहे.