पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात पेट्रोल ओतून घेत महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न
By रूपेश हेळवे | Updated: April 11, 2023 14:28 IST2023-04-11T14:28:39+5:302023-04-11T14:28:54+5:30
मला न्याय पाहिजे असे म्हणत महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आयुक्तालय परिसरात आत्महत्याचा प्रयत्न केला.

पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात पेट्रोल ओतून घेत महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न
सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालय परिसरात एका महिलेने अंगावर पेटून ओतून आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. उजमा पत्तेवाले (रा. पंजाब तालीम) असे आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मला न्याय पाहिजे असे म्हणत महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आयुक्तालय परिसरात आत्महत्याचा प्रयत्न केला. त्या महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, घडलेल्या या प्रकरणामुळे पोलिस आयुक्तालयातील पोलिस कर्मचाऱ्याची एकच तारांबळ उडाली होती. दरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान ठेवत मध्यस्थी करत महिलेला ताब्यात घेतल्याने अनाहूत घटना कळली.