टेंभुर्णीत भाजी विक्रेत्यावर चौघांनी केला कोयत्याने हल्ला; बंदुकीतून गोळीही झाडली

By Appasaheb.patil | Published: March 24, 2024 10:04 PM2024-03-24T22:04:17+5:302024-03-24T22:05:50+5:30

घटना घडताच आरोपींनी तेथून पलायन केले. जखमी पवार यास येथील मार्स हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत.

A vegetable seller in Tembhurni was attacked by four; The gun also fired in solapur | टेंभुर्णीत भाजी विक्रेत्यावर चौघांनी केला कोयत्याने हल्ला; बंदुकीतून गोळीही झाडली

टेंभुर्णीत भाजी विक्रेत्यावर चौघांनी केला कोयत्याने हल्ला; बंदुकीतून गोळीही झाडली

गणेश पोळ 

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील भाजी विक्रेत्यावर सायंकाळी ५.३० वाजण्याचा सुमारास अज्ञात तिघांनी बंदुका व कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. राहूल महादेव पवार (वय ३६ रा. महादेव गल्ली, मिर्ची बाजार) असे गंभीर जखमी तरूणाचे नाव आहे.

दरम्यान, सोलापूर - पुणे महामार्गावर जगदंबा गुजराती थाळी शेजारी राहूल पवार यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून सायंकाळी जेवण करण्यासाठी दुकान बंद केले होते. भाजी दुकान उघडून ते आपल्या दुकानात बसले होते. सायंकाळी चार चाकी वाहनातून अज्ञात चौघांनी जीवघेणा हल्ला करण्याचा दृष्टीने पवार यांच्या जगदंबा फ्रूट व भाजी दुकानासमोर कार लावून त्यातील तिघांनी हातात गावठी पिस्तूल बंदुक व कोयता घेऊन आत दुकानात उड्या मारून हल्ला केला. यामध्ये झटापटीत पवार यांच्या मांडीत गोळी घुसली असून डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले आहेत. घटना घडताच आरोपींनी तेथून पलायन केले. जखमी पवार यास येथील मार्स हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक पोलीस अधिक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील, कुलदीप सोनटक्के यांनी घटना स्थळास भेट देऊन पाहणी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी टीम तैनात करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी सांंगितले.

Web Title: A vegetable seller in Tembhurni was attacked by four; The gun also fired in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.