पोलिसांची नजर चुकवून जाणाऱ्या दुचाकीला टेम्पोची धडक, तरूण ठार
By रूपेश हेळवे | Updated: January 11, 2023 18:35 IST2023-01-11T18:34:59+5:302023-01-11T18:35:19+5:30
श्रीशैल दत्ता हजारे ( वय २०, रा. दोड्डी, दक्षिण सोलापूर ) व मयत विठ्ठल किसन काळे ( वय २०, रा. दोड्डी) हे बुधवारी सकाळी दोड्डी हून बोरामणीकडे दुचाकीवरून डबलशीट जात होते.

पोलिसांची नजर चुकवून जाणाऱ्या दुचाकीला टेम्पोची धडक, तरूण ठार
सोलापूर : पोलिसांची नजर चुकवून जाताना पाठीमागून येणार्या टेम्पोने दुचाकी स्वाराला धडक दिल्याने जखमी झालेल्या विठ्ठल किसन काळे ( वय २०, रा. दोड्डी, दक्षिण सोलापूर ) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दोड्डी ते बोरामणी दरम्यान बुधवारी सकाळी घडली.
श्रीशैल दत्ता हजारे ( वय २०, रा. दोड्डी, दक्षिण सोलापूर ) व मयत विठ्ठल किसन काळे ( वय २०, रा. दोड्डी) हे बुधवारी सकाळी दोड्डी हून बोरामणीकडे दुचाकीवरून डबलशीट जात होते. तेव्हा बोरामणी स्टॅण्ड जवळ वाहतूक पोलिसांची नजर चुकवून जाताना पाठीमागून येणार्या चार चाकी टेम्पो चालकाने धडक दिली. यात दोघे खाली पडले. श्रीशैल याच्या तोंडास जखम झाली तर विठ्ठल याच्या डोक्याला जखम झाली. उपचारादरम्यान विठ्ठल काळे याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.