मंगळवेढा येथे राहत्या घरात शिक्षकाची आत्महत्या
By प्रताप राठोड | Updated: March 28, 2023 18:13 IST2023-03-28T18:13:12+5:302023-03-28T18:13:31+5:30
मंगळवेढा येथे राहत्या घरात शिक्षकाने आत्महत्या केली.

मंगळवेढा येथे राहत्या घरात शिक्षकाची आत्महत्या
सोलापूर: मंगळवेढा येथील नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले रामचंद्र सेवू राठोड (वय ४७) याने अज्ञात कारणावरून राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची फिर्याद मयताचा भाऊ लिंबाजी शिवाजी राठोड (वय ५२ ) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवार दि. २८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजण्यापूर्वी रामचंद्र शेऊ राठोड याने मंगळवेढा येथील बनशंकरी कॉलनी येथे अज्ञात कारणाने त्याचे रहाते घरातील बेडरुम मधील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, विवाहित मुलगी व भाऊ आहेत.