बाईकस्वारानं उडवल्यानं शौचाला बसलेला चिमुकला जखमी; मंगळवेढा- बोराळे रोडवर अपघात
By विलास जळकोटकर | Updated: June 18, 2023 17:09 IST2023-06-18T17:09:16+5:302023-06-18T17:09:27+5:30
बाईस्वाराविरुद्ध गुन्हा

बाईकस्वारानं उडवल्यानं शौचाला बसलेला चिमुकला जखमी; मंगळवेढा- बोराळे रोडवर अपघात
सोलापूर : वीटभट्टीच्या रोडवर शौचाला बसलेल्या सहा वर्षाच्या चिमुकल्याला बाईकस्वारानं उडवल्याने त्याच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. मंगळवेढा - बोराळे रोडवर ही ही घटना घडली. अरुण दत्ता शेगर (वय- ६, रा. पळसदेव ता. इंदापूर) असे जखमी मुलाचे नाव आहे.
या प्रकरणी शनिवारी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. यातील जखमी अरुण शेगर हा फिर्यादी अर्जुन शेखर (वय- २३) यांचा पुतण्या आहे. एक जून रोजी जखमी अरुण हा मंगळवेढा-बोराळे रोडजवळील वीट भट्टी जवळील रस्त्याच्या कडेला शौचाला बसला होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास एम. एच. १३ डीआर ३०८२ याबाईकवरुन येणाऱ्या स्वाराने रस्त्याची अवस्था न पाहता वाहन चालवून अरुण शेगर या बालकाला उडवले. यामुळे त्याच्या डो्क्याला मार लागला. डाव्या हाताला गंभीर मार लागून जखमी केले. उपचारानंतर जखमीच्या चुलते अर्जुन यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला आहे. तपास पोलीस नाईक दुधाळ करीत आहेत.